भरधाव मोटारसायकलवरून विनयभंग करणारया रोडरोमीओला ३ वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा

अहमदनगर : आरोपी नामे मिनीनाथ दिलीप चव्हाण , वय - २४ वर्षे , रा . जीएसपी . इंम्पोरीयम अपार्टमेंट , नाना चौक तपोवन रोड , अहमदनगर याने पिडीत फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही गंगा उदयान रोडने तिच्या भावासोबत सायकलवरून घरी जात असताना , तिचा विनयभंग केल्याप्रकरणी अहमदनगर येथील मा . माधुरी एच . मोरे मॅडम , अतिरिक्त व विशेष ( पोक्सो कोर्ट ) जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी दोषी धरून भा.दं.वि. कलम ३५४ , ३५४ ( अ ) तसेच लहान मुलांचा लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा २०१२ कलम ८ नुसार दोषी धरून आरोपीस ३ वर्षे सक्त मजुरी व रुपये १,००० / - दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली *. सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले .* 
घटनेची थोडक्यात हकीगत की ,  दिनांक ११.०८.२०२१ रोजी पिडीत मुलगी ही संध्याकाळी ७ वाजता तिचा लहान भावासोबत क्लासवरून घरी येत होती . दोघे गंगा उदयानच्या बाजूला पंकज कॉलनीकडे जाणा - या रस्त्यावरून घराजवळ पोहचले असता , आरोपी मिनीनाथ दिलीप चव्हाण हा त्याचे मोटार सायकलवरून पाठीमागून पुढे गेला व थोडा पुढे जावून पिडीत मुलीला पाहून त्याने त्याची मोटारसायकल वळून पुन्हा मागे आला . घटना ठिकाणी अंधार असल्याचा तसेच पिडीत मुलगी व तिच्या भावासोबत दुसरी मोठी कोणी व्यक्ती नसल्याचे पाहून  आरोपीने पिडीत मुलगी हिची उजव्या बाजुची छाती दाबली . त्यामुळे पिडीत मुलगी हिने घाबरून जोराने पागल अशी ओरडली . घटनेनंतर आरोपी त्याची मोटारसायकल भरधाव वेगाने घेवून पळून गेला . सदरची घटना पिडीत मुलीने घरी आल्यानंतर तिच्या घरच्यांना सांगितली . त्यानंतर पिडीत मुलगी व तिचे वडील व काका यांनी आरोपीचा परिसरात शोध घेतला असता , आरोपी गंगा उद्यान जवळ त्याच्या मोटारसायकलसोबत सापडला . पिडीत मुलीच्या घरच्यांनी व जमलेल्या इतर लोकांनी आरोपीस पकडून तोफखाना पोलिस स्टेशनला घेवून गेले . सदर बाबत पिडीत मुलीने तोफखाना पोलिस स्टेशनला रितसर फिर्याद दिली . घटनेचा संपूर्ण तपास सहा . पो.नि. रविंद्र पिंगळे यांनी करून मा . न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले . या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले . यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी , पंच साक्षीदार तपासी अधिकारी , वयासंदर्भात मुख्याध्यापक तसेच महानगर पालिका यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या . सरकारी वकीलांनी युक्तीवादाचे वेळी मे . कोर्टाचे निदर्शनास आणून दिले की , *सदयाच्या काळामध्ये रहदारी असलेल्या महामार्गांवर भरधाव वेगाने मोटारसायकल चालवून महिलांच्या गळयातील मंगळसुत्र वगैरे आदी मौल्यवान वस्तु जोरात ओढून पळून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत . सदरच्या घटना या वरवर चोरीच्या दिसत असल्यातरी या घटनेमध्ये पिडीत महिला या गंभीररित्या जखमी होवून मयत देखील झालेल्या आहेत . या केसमध्ये जर आरोपीस निर्दोष मुक्त केले तर , अशा घटनांमध्ये वाढ होईल . तसेच समाजातील चैन स्नॅचींग करणा - या घटनामध्ये वाढ व आरोपींचे मनोधैर्ये वाढेल याचा समाजावर अतिशय वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच सदरची घटनाही अतिशय गंभीर स्वरूपाची आहे . घटनेमुळे पिडीत मुलगी हिचे मनावर अतिशय गंभीर परिणाम झालेला आहे* असा युक्तीवाद केला . सरकारी वकीलांचा युक्तीवाद तसेच आलेला पुरावा ग्राहय धरून आरोपीस मा . न्यायालयाने वरिल प्रमाणे शिक्षा ठोठावली . सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले . त्यांना पैरवी अधिकारी आडसुळ यांनी सहकार्य केले . 
अहमदनगर 
ता . १७/१२/२०२२ 

 ( अॅड . मनिषा पी . केळगंद्रे- शिंदे )
 विशेष सरकारी वकील , अहमदनगर .

 मो . ९ ८५०८६०४११,
८२०८ ९९ ६७ ९ ५

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा