आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणारा मास्टरमाईंड कोणी जिहादी वा मुस्लीम नसून हिंदू वीर अमर अर्जुन शिंदे हा होता

अफवा व चुकीच्या माहितीपासून सावधान... -तुषार गायकवाड
स्वातंत्र्यदिनी सातारा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल इंन्स्टाग्राम या सोशल मेडीया अ‍ॅपवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणारा मास्टरमाईंड कोणी जिहादी वा मुस्लीम नसून हिंदू वीर अमर अर्जुन शिंदे हा होता. हे पोलीस तपासात उघड झाले आहे. मात्र या प्रकरणात मुस्लीम युवकाचे इंन्स्टाग्राम अकाउंट कसे वापरले ठाऊक आहे का?

अल्पवयीन मुस्लीम युवक अरमान शेख आणि हिंदू अमर शिंदे या दोघांची एक काॅमन मैत्रीण दोघांसोबत इंन्स्टाग्राम वर चॅट करायची. हि बाब अमर शिंदेला समजल्यावर त्याने अरमान शेखला धडा शिकवण्याचे ठरवले. त्यानुसार अमर शिंदेने संबंधित मैत्रीणीच्या नावे इंन्स्टाग्रामवर दुसरे बनावट अकाउंट सुरु केले.

या बनावट इंन्स्टाग्राम अकाउंट वरुन अरमान शेख याचेशी संपर्क साधला. चॅटींग होवू लागले. थोडक्यात या चॅटींग दरम्यान कुरुलकर प्रकरणाप्रमाणे हनी ट्रॅप रचून अरमानच्या इंन्स्टाग्राम अकाउंटचा युझर आयडी आणि पासवर्ड मागितला. अशा प्रकरणात जी चूक सज्ञान पुरुष करतो, तीच चूक अरमान शेखने केली. स्वतःच्या इंन्स्टाग्राम अकाउंटचा युझर आयडी आणि पासवर्ड शेअर केला.

बस्स! इथंच घोटाळा झाला. अरमान शेख कितीही राष्ट्रप्रेमी असला तरी तो मुस्लीम आहे हे कारण हिंदुत्ववाद्यांना पुरेसे आहे. अर्जुन शिंदेने याच कारणाचा फायदा घेत अरमान शेख याच्या इंन्स्टाग्राम अकाउंट वरुन देशाच्या स्वातंत्र्यदिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला आणि युवा सातारा एकवटला! 

स्वातंत्र्यदिनी शहरात किरकोळ तोडफोड केली गेली. सातारा शहरातील सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण यांच्या कार्यालयाची जमावाने नाहक तोडफोड केली. त्यादिवशी पालकमंत्री शंभूराज देसाई शहरात होते. शंभूराज देसाई यांचेशी आमचे वैयक्तिक पातळीवर राजकीय मतभेद आहेत. मात्र त्यांनी जमावाची हाताळणी अतिशय शांतपणे, मुत्सद्दीपणे केली. त्याबद्दल त्यांचे कौतुक व धन्यवाद!

सातारा पोलीसांनी या घटनेची पाळेमुळे खणून काढली. त्यामुळे सातारा शहर दंगलीपासून वाचले. परवा सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे घडलेली घटना व सदर घटना या दोन भिन्न घटना आहेत. पुसेसावळी प्रकरणातील तपास सातारा पोलीस करत असून या तपासात पोस्ट लिहिपर्यंत अजून तरी हॅकिंग संदर्भातील कोणतीही माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही.

सदरील दोन्ही घटनांचे एकत्रिकरण करुन पुसेसावळी प्रकरणात सोशल मेडीयावर पुरोगामी व हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांकडून दिशाभूल केली जात आहे. चुकीच्या माहितीपासून सावध रहावे व पूर्ण माहिती घेतल्याशिवाय आपले मत व्यक्त करुन नवीन अफवेला जन्म देऊ नये यासाठी हा पोस्टप्रपंच!!

तळटीप : सर्वधर्मीय, सर्वजातीय पालकांनी आपल्या मुलांच्या सोशल मेडीया हालचालींवर लक्ष ठेवणे हा प्राथमिक उपाय आहे हे आम्ही याआधीच्या कालच्या पोस्ट मध्ये सांगितले होते ते यासाठीच!लक्षात घ्या आपल्या मुलांची अकाउंट हॅक करण्यासाठी सायबर एक्सपर्टची गरज नाही. फेक अकाउंटवरुन हनी ट्रॅप वापरुन हॅकिंग होवू शकते.

- तुषार गायकवाड

#महाराष्ट्रहितार्थ

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा