मुनव्वर हुसेन छोटे खान यांना राष्ट्रीय भाषा शिक्षक पुरस्कार जाहीर

अहमदनगर - कौमी उर्दू शिक्षक कर्मचारी संघ भारत तर्फे  2023 साठीचा नॅशनल लँग्वेज टीचर अवॉर्ड म्हणजेच राष्ट्रीय भाषा शिक्षा पुरस्कार मुनव्वर हुसेन छोटे खान यांना नुकताच जाहीर करण्यात आला.हा पुरस्कार संपूर्ण देशातील निवडक शिक्षकांना दिला जातो.
मुनव्वर हुसेन छोटे खान एम.ए (इंग्लिश) व बी.एड. असुन अहमदनगर उर्दू हायस्कूल, अहमदनगर (मिसगर लायब्रेरी) या शाळेत शिक्षक आहे. उर्दु, हिंदी, आणि इंग्रजी भाषेचे गाढे अभ्यासक असून या भाषांमध्ये ते साहित्य सृजन करतात. ते एक कुशल अणि तज्ज्ञ भाषांतरकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत.तसेच शिक्षक भारती उर्दू संघटना, अहमदनगरचे जिल्हा सेक्रेट्री व इदारा अदबे इस्लामी अहमदनगर (उर्दू साहित्य संघटना) चे सेक्रट्री आहे. व त्यांनी त्यांचे आजोबा हिम्मत अहमदनगरी यांचे                    पुस्तक "नुरुलहुदा" 2016 मध्ये प्रकाशित केले असुन अहमदनगर जिल्ह्यात विविध साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील विविध उपक्रमात अग्रेसर असतात. स्वत: उर्दू कवी आहे. त्यांना गुफ्तगू साहित्यिक संस्था, प्रयागराज तर्फे आधुनिक भारताचे गज़लकारासोबत "फिराक गोरखपुरी सम्मान" 2022 मिळालेला आहे. 
राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय भाषा
शिक्षक पुरस्कार पुढील महिन्यात त्यांना गालिब इनस्टट्यूट,दिल्ली येथे एका भव्य समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.त्यामुळे शिक्षण क्षेत्रात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा