अहमदनगर: अहमदनगरमध्ये २६ ते ३० जानेवारी दरम्यान लोकशाही उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिन ते हुतात्मा दिन असे पाच दिवस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध महाविद्यालये व शाळामध्ये व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, निबंध स्पर्धा, पथनाट्य, बहुभाषिक कविसंमेलन आदि कार्यक्रमांचे आयोजन अहमदनगर शहर व जिल्ह्याच्या विविध तालुक्यात करण्यात आल्याची माहिती लोकशाही उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे यांनी दिली.
२६ जानेवारी २०२३ रोजी ज्येष्ठ विचारवंत जयदेव डोळे यांच्या व्याख्यानाने उद्घाटन होईल. हा कार्यक्रम सावेडीतील रावसाहेब पटवर्धन स्मारक येथे होईल. शुक्रवार, ता. २७ जानेवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यातील निवडक महाविद्यालये व शाळामध्ये लोकशाही जिंदाबाद, लोकशाही एक जीवनप्रणाली इत्यादी विषयावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. २८ जानेवारी रोजी दिवसभर ‘आपले हक्क, आपले कर्तव्य’ या विषयावर ऍड. कारभारी गवळी यांच्या अध्यक्षतेखाली चांदबीबी महाल येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. रविवार, ता. २९ जानेवारी रोजी अहमदनगर शहर व कर्जत तालुक्यात ‘जागर लोकशाहीचा’ या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सोमवार ता. ३० जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता सर्जेपुरा येथील रहेमत सुलतान हॉल येथे प्रसिद्ध कवी संतोष पद्माकर पवार यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली बहुभाषिक कविसंमेलांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे खजिनदार अशोक सब्बन यांनी दिली.
Post a Comment