पत्नीनेच केला नईम पठाणचा खुन

क्रमांकपीआरओ/प्रेसनोट/215/2023 प्रेस नोट दिनांक:- 22/09/2023
-------------------------------------------
एकलहरे, श्रीरामपूर येथील खुनासह दरोडा गुन्ह्यात,
मयताची पत्नी निघाली आरोपी 
स्थानिक गुन्हे शाखेकडुन गुन्ह्याची उकल.
--------------------------------------------------------------------------------------
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी श्री. अन्वर बिराम शेख वय 59, रा. एकलहरे, ता. श्रीरामपूर यांनी
दिनांक 21/09/23 रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, त्यांची मुलगी नामे बुशरा नईम पठाण ही आपले पती नईम पठाण व मुलांसह घरात झोपलेले असताना रात्री 01.45 वा. चे सुमारास अनोळखी 4 ते 5 इसमांनी घरात प्रवेश करुन बुशरा हिचे डोक्यात बॅटरी मारुन हिस बेशुध्द करुन जावई नामे नईम पठाण यास साडीने गळास फास देवुन कपाटात ठेवलेले 7,00,000/- रोख व सोन्याचे दागिने असा एैवज चोरुन नेला आहे. सदर घटने बाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 1014/2023 भादविक 394, 396 प्रमाणे खुनासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी घटना ठिकाणास भेट देवुन पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात, सफौ/बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ/मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, पोकॉ/सागर ससाणे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, मपोकॉ/सरग व चापोहेकॉ/उमाकांत गावडे अशांनी घटनास्थळाचा बारकाईने अभ्यास करुन व साक्षीदारांना विचारपुस केली होती. मयत नईम पठाण याची पत्नी बुशरा पठाण हिस विचारपुस करता तिने सांगितलेली हकिगत व घटनास्थळी असलेली परिस्थीती यावरुन पोनि/श्री. दिनेश आहेर यांचा साक्षीदार बुशरा पठाण यांचेवर संशय बळावला होता. त्या प्रमाणे बुशरा पठाण हिचेकडे महिला पोलीस अंमलदारा समक्ष विचारपुस करता तिने पती नईम पठाण याचेशी 10-12 वर्षापुर्वी लग्न झाल्याचे सांगुन पती नईम पठाण हा मागिल 6-7 वर्षापासुन नेहमी मनाविरुध्द लैगिंक छळ करत होता. सदर त्रासास कंटाळुन रात्री झोपतांना त्याला दिलेल्या दुधामध्ये झोपेच्या गोळ्या घालुन गुंगी आल्यानतंर साडीचे एक टोक खिडकीचे गजास बांधुन त्याचे गळ्यास आवळुन साडीचे दुसरे टोक दोन्ही हाताने ओढुन पतीस जिवे ठार मारले अशी माहिती दिली. तसेच घरात चोरीस गेलेल्या सोन्याची दागिने व रोख या बाबत विचारपुस करता 1) महिला आरोपी बुशरा नईम पठाण हिने चोरीचा बनाव केल्याची कबुली दिल्याने तिस ताब्यात घेवुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहरपोलीस स्टेशन करीत आहे.    
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर, मा. डॉ. श्री. बसवराज शिवपुजे साहेब, उविपोअ, श्रीरामपुर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. 

पोलीस अधीक्षक, अहमदनगर
यांचेकरीता

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा