नेवासा :नेवासा तालुका विज्ञान प्रदर्शनात नेवासा उर्दू पीएमश्री शाळेने कमाल केली! इयत्ता ४ च्या तांबोळी फातेमा या हुशार विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावून शाळेचा गौरव वाढवला. तालुक्यातील अनेक शाळांमधून सहभागी झालेल्या या स्पर्धेत उर्दू शाळेने बाजी मारत सर्वांना मागे टाकले.
या यशाबद्दल पालकवर्ग, तालुक्यातील विविध संघटना आणि स्थानिक नागरिक शाळेत येऊन अभिनंदन करीत आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका फरहाना बाजी, मार्गदर्शिका नुजहत बाजी आणि सर्व शिक्षकांचे जोरदार कौतुक होत आहे. याशिवाय, पदवीधर शिक्षिका गौसीया बाजी यांनी शिक्षक स्पर्धेत सहभाग घेऊन शाळेला पहिला क्रमांक मिळवून दिला, ज्यामुळे त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
शाळेतील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे श्रेय सर्व शिक्षकांना जाते. विशेषतः मार्गदर्शक शेख फरहाना, पठाण रिजवाना, शेख हसीना, शेख गौसीया नाज, शेख नुजहत, शेख वाजेदा आणि सय्यद नाजीया यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन हे यश साध्य केले. अशा मेहनतीमुळे शाळा तालुक्यातील आदर्श ठरली आहे
Post a Comment