परिसराची स्वच्छता ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी - शिरिष रायते; मनपा स्वच्छता कर्मचारी घन:श्याम चौहान यांचा नागरिकांनी केला सत्कार

रयत समाचार

अहमदनगर (प्रतिनिधी) २२.९.२०२३

     प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरु करुन सर्वांनाच स्वच्छतेची सवय लावली आहे. त्यासाठी विविध स्तरावर पारितोषिकेही जाहीर केली आहे. स्वच्छ शहर सुंदर शहर परिक्षणात अहमदनगर मनपालाही राज्यस्तरीय बक्षिस मिळाले आहे. यात सफाई कर्मचार्‍यांचा मोठा वाटा राहिला आहे. महात्मा फुले मार्ग म्हणजेच बालिकाश्रम रोडवरील सर्वोदय कॉलनीत अनेक वर्षांपासून दररोज सकाळी साफसफाईचे काम करणारे मनपा कर्मचारी घनश्याम चौहान हे अतिशय मन:पुर्वक व विनातक्रार सेवा देत आहेत. त्यांच्या कामाचे कौतुक करुन त्यांच्या सत्कार करणे हे आमचे कर्तव्य आहे. सर्वांचे मने जिंकून आपल्या कार्याचा त्यांनी वेगळा ठसा उमटविला आहे. प्रत्येकाने आपल्या घराबरोबरच परिसर ही स्वच्छ ठेवला पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन सर्वोदय कॉलनीचे चेअरमन शिरिष रायते यांनी केले.

     बालिकाश्रम मागील सर्वोदय कॉलनीच्या वार्षिक सभेत मनपाचे स्वच्छता कर्मचारी घन:श्याम चौहान यांचा चेअरमन शिरिष रायते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ सभासद विजय वाळूंजकर, संजय धोपावकर, अशोक गांधी, बाळासाहेब वैद्य, चैतन्य वाळूंजकर, डॉ.उमेशचंद्र सुद्रिक, अ‍ॅड.सतिषचंद्र सुद्रिक, अ‍ॅड.अंजली सुद्रिक, शरद सुद्रिक, अद्वैत कुलकर्णी, संजय मोरे, सुबोध कुलकर्णी, शोभा कुलकर्णी, गोविंद केसकर, कालिंदी केसकर, श्रीमती राहिरीकर, डॉ.घोरपडे, बडवे, त्र्यंबके, शाह, चिंताबर, जरीवाला आदि उपस्थित होते.

अ‍ॅड.सतिशचंद्र सुद्रिक 9822030523

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा