अहमदनगर दि- 22, सप्टेंबर:- राष्ट्रीय पोषण माह व आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य (भरड धान्य) वर्ष 2023 निमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अमहदनगर येथील केंद्रीय संचार ब्यूरोच्यावतीने दि. 22 ते 24 सप्टेंबर, 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी जयश्री आव्हाड व अहमदनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्या हस्ते करण्यात आले.अहमदनगर शहरातील, माऊली सांस्कृतिक सभागृह, न्यू टिळक रोड येथे आयोजित मल्टिमिडिया चित्र प्रदर्शनाच्या उदघाटन कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रविंद्र ठाकूर,माहिती अधिकारी अमोल महाजन, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक संजय गर्जे, उमेद चे सहायक प्रकल्प संचालक सोमनाथ जगताप, एकात्मिकबालविकास प्रकल्प अधिकारी सुधीर पाटील व सय्यद शेफिक, प्रसिध्दी अधिकारी माधव जायभाये, सहायक प्रसिध्दी अधिकारी पी. कुमार, निवृत्त वरिष्ट बॅंक अधिकारी तथा योग शिक्षण विनायक पवळे ,दूरदर्शन प्रतिनिधी मनोज सातपूते यांच्यासह शहरातील बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका व अंगणवाडी कार्मचारी उपस्थित होत्या.आहारातील तृणधान्याचे महत्व, या पौष्टिक धान्यांचा प्रसार व प्रसार तसेच पारंपरिक धान्याच्या उत्पादन वाढीसाठी शासन स्तरावर करण्यात येणारे प्रयत्न तसेच या धान्यांचा आहारात समावेश केल्यास विविध आजारांपासून होणारी सूटका व निरोगी आयुष्यासाठी त्यात असलेल्या जीवनस्तवासह पौष्टीकतेची माहितीही उपस्थित मान्यवरांनी दिली.या प्रदर्शनात सर्व आजारांना दूर ठेवणाऱ्या पौष्टीक धान्य आणि त्या धान्यांपासून तयार करण्यात आलेल्या चविष्ट पदार्थांसह सकस आहारांची माहिती छाया चित्र आणि चित्रफितींच्या(व्हीडीओ) माध्यमातून देण्यात आली आहे.
सूमारे 5 हजार स्केवर फुट अशा या सांस्कृतिक सभागृहात पौष्टक तृणन्यांच्या माहितीसह, या धान्यपासून बवविण्यात आलेले पदार्थ, त्यांचे सत्वगुण,सकस आहार(माता आणि बाळाचा आहार), चित्र फित आणि तृणधान्यांची माहिती असलेलेली छायाचित्रे एलईडी,टीव्हीच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आली आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य खुले असून सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यत खूले राहणार आहे.या प्रदर्शन स्थळी शहरातील बालविकास प्रकल्प कार्यालयाद्वारे तृणधान्यांपासून तयार करण्यात आलेल्या सकस व पौष्टीक आहाराचे प्रदर्शन, महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान(उमेद) व महिला आर्थिक विकास महमंडाद्वारे तृणधान्य व तापासून तयार करण्यात आले पदार्थांचे स्टॉलस् लावण्यात आले आहेत.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या पुस्तकांचे वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 22 ते 24 सप्टेंबर, 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनास जिल्हावासियांनी भेट द्यावी असे आवाहन प्रसिध्दी अधिकारी माधव जायभाये यांनी केले आहे.
Post a Comment