चांद सुलताना हायस्कूल मध्ये १० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा

अहमदनगर:- चांद सुलताना हायस्कूल मध्ये १० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल मतीन अ. रहीम यांनी "जीवना मध्ये यशस्वी होण्यासाठी स्वयंशिस्त व वेळेचे नियोजन गरजेचे आहे" असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बालभारती चे श्री. खान नवेदुल हक उपस्थित होते यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. श्री. सय्यद वहाब उमर यांनी विद्यार्थ्यांना आजच्या युगातील आव्हानांची जणिव करून दिली.या प्रसंगी शिक्षक वर्गांमधून खान फैरोज सरांनी "जीवनात कष्टाचे महत्त्व" ही संकल्पना विद्यार्थ्याना समजावून सांगितली.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शेख मोहमद समि सर यांनी "   निरोप क्षण नाही ; शुभेच्छाचा सण आहे पाऊल बाहेर पडताना रेंगाळणार मन आहे !" या उक्तीचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन १० वी च्या विद्यार्थ्यींनी पठाण तस्किन गुलजार व शेख कुलसूम गफ्फार यांनी व आभार बागवान कुदसिया मो. अली यांनी केले.या प्रसंगी शाळेचे उपमुख्यद्यापक तांबोळी  ,पर्यवेक्षक नायकवडी शगुफ्ता व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा