अहमदनगर - ओबीसींच्या विविध मागण्या राज्य व केंद्र शासनाकडे प्रलंबित असून त्याचा पाठपुरावा करणे बाबत अहमदनगर जिल्हा ग्रामीण काॅंग्रस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने जिल्हखधिकारी मार्फत राज्य व केंद्र शासनाकडे मागण्या केले आहेत.
१. जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र राज्यांमध्ये लागू करण्यात यावी.
२. बिहार राज्याप्रमाणे ओबीसींची जात निहाय जनगणना महाराष्ट्र करण्यात यावी.
३. ओबीसी, मागासवर्गीय तसेच अल्पसंख्याक समाजाशी संलग्न विविध महामंडळाची
कर्जे माफ करून शासन दरबारी आणि कोर्टात असलेल्या केसेस त्वरित मागे घ्याव्या.
४. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार
जाहीर करावा.
५. निवडणुकांमध्ये ईव्हीएम चा वापर बंद करण्यात यावा
६. महाविकास आघाडीच्या काळात जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसी विद्यार्थ्यांना
शासकीय वस्तीगृह सुरू करण्याच्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी.
वरील मागण्यांचा केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करून उचित कार्यवाही
व्हावी . या मागण्या पूर्ण न झाल्यास अहमदनगर काँग्रेस कमिटी ओबीसी विभागामार्फत दि. १५ मे २०२३ पासून संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येईल.असे सौ मंगलताई भुजबळ
राष्ट्रीय समन्वयक : राष्ट्रीय कांग्रेस,संतोष लोंढे.राष्ट्रीय
जिल्हाध्यक्ष ओबीसी कांग्रेस
إرسال تعليق