अहमदनगर - 2002-2003 साली काही समविचारी उद्योजकांनी सामाजिक जाणीवेतून ज्ञानसंपदा ही इंग्रजी माध्यमाची शाळा स्थापन केली. त्याशाळेच्या तपोवनरोड येथील नुतन भव्य इमारतीचे उदघाटन मंगलवार 4 एप्रील 2023 रोजी सकाळी 9 वाजता प.पु.स्वामी गोविंददेव गीरीजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे.
सुरुवातीला फक्त १३ विद्यार्थी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण बजाज यांच्या निवासस्थानी सुरु करण्यात आली.शाळेची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत या शाळारूपी रोपाने आपल्या वैभवात भर टाकत आज सुसज्ज इमारतीत 750 विधार्थांना घेऊन ज्ञानदानाचे कार्य अविरत करत आहे.
शाळा जरी इंग्रजी माध्यमाची असली तरी भारतीय संस्कृती आमच्या विद्यार्थ्यांमधे रुजवण्यासाठी शाळेने विविध उपक्रम नेहमीच हाती घेतले जसे की- कृतीयुक्त शिक्षण, परंपरा जोपासण्यासाठी विविध सण समारंभ, विज्ञान प्रदर्शन, मातृभाषा गौरव, नाट्यवाचन, कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, दिंडी उपक्रम,आनंदजत्रेतून (fun fair) व्यवहार कौशल्य, वैचारिक उद्बोधन होण्यासा व्याख्यानमाला, किल्ले बनवा स्वर्धा, बदलत्या शिक्षणपद्धतीशी संलग्न राहण्यासाठी शिक्षक कार्यशाळा इत्यादी,
या सर्व उपक्रमांचे फलित म्हणून २०१३-१४ पासून शाळेच्या १०वी च्या १००% निकालाची उज्ज्वल परंपरा आजतागायत कायम आहे.
विचारभारती मंचातर्फे आयोजित स्वा. सावरकर - एक विचारधारा या विषयावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता ९ वी ची विद्यार्थिनी मनाली कुलकर्णी हिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले, तसेच दामोदर मालपाणी ट्रस्ट व संस्कृत संवर्धन मंडळ, संगमनेर आयोजित संस्कृत श्लोक पाठांतर स्पर्धेत गेल्या सात वर्षांपासून सांधिक सहभाग घेतला जातो, व यश संपादन केले जाते. मेजर दिनभाऊ कुलकर्ण स्मरणार्थ सूर्यनमस्कार स्पर्धा तसेच माजी विद्यार्थी संघ आयोजित कशाकथन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले जाते.शाळेत विविध स्पर्धा परिक्षांचे आयोजन केले जाते. त्यासही विद्यार्थी उत्स्फूर्त सहभाग घेतात. जसे- स्कॉलरशिप, ऑलिंपियाड परिक्षाहोमी भाभा परीक्षा, हिंदी राष्ट्रभाषा परिक्षा इत्यादी.अशा प्रकारे विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेऊन आमच्या या ज्ञानमंदिराची वाटचाल यशस्वीपणे चालू आहे.
إرسال تعليق