शिक्षणाबरोबर कला संस्कार उगवत्या पिढीला तारणारे - डॉ.अमोल बागुल; जिल्हा वाचनालय व रोटरी ई-क्लब ऑफ एम्पॉवरींग युथच्या बाल संस्कार शिबीराचा शुभारंभ



◽ मख़दुम समाचार ◽

अहमदनगर (सुरेश मैड) २१.४.२०२३

    आत्मकेंद्रीय होणारी वृत्ती, मोठ्या पॅकेजची अपेक्षा, गुणांची जीवघेणी स्पर्धा यात उगवती पिढी गुदमरुन जात आहे. शिक्षणाबरोबर पाल्यांना चांगल्या कला, वाचन, खेळ यांचे संस्कार ही काळाची गरज असून, व्यक्तीमत्व शिबीराच्या माध्यमातून ही कला-संस्काराची रुजणारी वीजे अगवत्या पिढीला तारणारे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक व स्वच्छता दूत डॉ.अमोल बागुल यांनी व्यक्त केले.

     अहमदनगर जिल्हा वाचनालय व रोटरी ई-क्लब ऑफ एम्पॉवरींग युथच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय व्यक्तीमत्व शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ.बागुल बोलत होेते. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यां रो.सुशिला मोडक, वाचनालयाच्या संचालिका प्रा.ज्योती कुलकर्णी, शिल्पा रसाळ, किरण आगरवाल, रोटरी इ-एम्पॉवरींग अध्यक्ष नंदिनी जग्गी, सचिव सविता चढ्ढा, समन्वयक डॉ.बिंदू शिरसाळ, जागृती ओबेरॉय, कला शिक्षक वृषाल एकबोटे, भालेराव, ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल आदि उपस्थित होते.

     प्रास्तविकात प्रा.ज्योती कुलकर्णी यांनी गेल्या २५ वर्षांपासून जिल्हा वाचनालय हे शिबीर आयोजित करुन सुदृढ पिढी निर्मितीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

     शिल्पा रसाळ यांनी या शिबीरात होणार्‍या विविध उपक्रमाची माहिती दिली. अध्यक्षा नंदिनी जग्गी यांनी बोलतांना रोटरी सातत्याने शालेय व युवा पिढीच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून या शिबीराच्या माध्यमातून कला, संस्कृती, पर्यावरण, स्वच्छता, व्यक्तीमत्व विकास यांचे संस्कार रुजवले जाणार असल्याचे सांगितले.

     सुशिला मोडक यांनी याप्रसंगी संवाद साधतांना शिबीरातून मिळणारे संस्कार भविष्यात आभाळाला गवसणी घालणारी पिढी निर्माण करेल, असा आशावाद व्यक्त केला.

     उपस्थित मान्यवरांचे स्वागत संचालक किरण आगरवाल यांनी केले.

     दि. २६ एप्रिलपर्यंत चालणार्‍या शिबीरात प्रा.स्वाती आहेर (तणावमुक्त अभ्यास पद्धती), रविंद्र चोभे (ट्रेकिंग, पर्यावरण), चारुता शिवकुमार (मानसिक आरोग्य), वृषाल एकबोटे (कला,संस्कार, देशभक्ती), जागृती ओबेरॉय (कथा-कथन) आदि मान्यवर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती ग्रंथपाल अमोल इथापे यांनी दिली.

     शिबीर यशस्वीतेसाठी अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड, प्रा.ज्योती कुलकर्णी, शिल्पा रसाळ, किरण आगरवाल, संचालक मंडळ व कर्मचारी प्रयत्नशिल आहेत. शिबीरात मोठ्या संख्येने शिबीरार्थी सहभागी झाले आहेत.






🤩 देशाची फेव्हरेट बाईक स्प्लेंडर आता इलेक्ट्रिक मध्ये; बघा, काय आहे किंमत आणि मायलेज

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा