▫️ मख़दुम समाचार ▫️
नेवासा (कार्तिक पासलकर) २७.४.२०२३
तालुक्यातील चांदा परिसरात काल सायंकाळी ५ च्या सुमारास मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. चांदा बाजारपेठेतील विजेचा खांब कोसळून तांबोळी यांच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले तसेच चांदा-कुकाणा रोडवर उस्मान भाई यांच्या पत्र्याचे शेड उडून गेले. हायवेवर झाड पडून रस्ता बंद पडून काही काळ वाहतुक ठप्प झाली होती. विजय दहातोंडे, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब नाना दहातोंडे, सागर दिवटे यांनी रस्त्यावरील झाड हटवून वाहतुकीला रस्ता खुला करून दिला. ग्रामपंचायत सदस्य सादिक भाई शेख, सागर जावळे, मिनीनाथ थिटे यांनी घटनास्थळी जाऊन मदत केली.
परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागचे पंचनामे झाले नाहीत, तोच पुन्हा अवकाळी पावसाने पुन्हा तडाखा दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
◾
हे हि वाचा : माधुरी दीक्षित : Beauty with Brain कालातीत सौंदर्याची सम्राज्ञी. 'कलावार्ता'मधील गुरुदत्त वाकदेकरांचा लेख
إرسال تعليق