अहमदनगर - जागतिक थॅलेसेमिया दिनाचे औचित्य साधून 6 मे 2023 रोजी अहमदनगर होमिओपॅथिक कॉलेज आणि हॉस्पिटल येथे ऋतुजा फाउंडेशन अहमदनगर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा रुग्णालय अहमदनगर, शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन, एम.व्ही.आर फाउंडेशन (पुणे), कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित थॅलेसमिया रूग्णांची जनजागृतीसाठी विविध तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये थॅलेसमिया योद्ध्यांची वार्षिक तपासणी, थॅलेसमिया योद्ध्यांची विवाह नोंदणी,एच एल ए टाइपिंग,बोन मॅरो रजिस्ट्रेशन,रक्तदान शिबिर, अवयव दान शिबिर, थॅलेसेमिया मायनरची इलेक्ट्रोफोरोसिस तपासणी इत्यादी शिबिरांचे आयोजन करण्यात आले.शंभरहून जास्त पेशंटची तपासणी आणि तेवढ्याच अधिक संख्येने मायनर ची तपासणी या शिबिरात करण्यात आली.
प्रास्तविकात ॲड.डॉ. अंजली केवळ यांनी विविध शिबिरांची माहिती दिली. तसेच दोन थेलेसेमिया मायनर व्यक्तींचे जर लग्न झाले तरच थॅलेसमिया मेजर बाळ जन्माला येण्याची शक्यता प्रत्येक गर्भधारणेत 25% असते आणि हे प्रमाण पंजाब गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. प्रत्येकाने लग्नाअगोदर थॅलेसमियाची तपासणी करणे आवश्यक आहे अशी माहिती केवळ यांनी दिली.
जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, अहमदनगरच्या सचिव श्रीमती भाग्यश्री का.पाटील यांनी थॅलेसमिया योद्धांसाठी अडचणीच्या काजव्यातून यशाचे तारांगण निर्माण करा आणि प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी धैर्याने पुढे यायला पाहिजे.तववेदना जेव्हा मम वेदना होते तेव्हा संवेदना होते आणि या सहवेदनेतून आणि संवेदनेतून ऋतुजा फाउंडेशन काम करत आहे असे त्यांनी प्रतिपादन केले तसेच संपूर्ण ऋतुजा फाउंडेशनच्या टीमचे अभिनंदन केले.
त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक साहेब रावजी घाडगे पाटील , त्रिमूर्ती नगर यांनी अशा शिबिरांचे आयोजन ऋतुजा फाउंडेशन करतेय त्यांचे कौतुक वाटते. तसेच मुलगी ऋतुजा ज्या आजारातून बरी झाली त्या रुग्णांसाठी ऋतुजा फाउंडेशनच्या सचिव अंजलीचे काम कौतुकास्पद असून आमचा आणि आमच्या संस्थेचा त्यांना कायम पाठिंबा असेल असे वक्तव्य त्यांनी केले.
कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबई येथील डॉ.रेणुका पाटील यांनी एच एल ए तपासणी का करावी याची सविस्तर माहिती दिली.
अध्यक्षस्थानी अहमदनगर होमिओपॅथिक शिक्षण संस्थेचे डॉ.समीर होळकर हे होते. थॅलसेमियाला मुळापासून उपटून टाकण्यासाठी अशा कॅम्पच्या आवश्यकता आहे असे त्यांनी सांगितले.पेरेंट्स असोसिएशन थॅलेसेमिया युनिटच्या ज्योती टंडन यांनी एच एल ए टायपिंग साठी विशेष सहकार्य केले.
जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. झेंडे आणि सौ.सोनाली खांदवे यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगितले.
हिमॅटॉलॉजी डे केअर सेंटर, जिल्हा रुग्णालयाच्या डाॅ.रूपाली कुलकर्णी आणि जिल्हा समन्वयक आशिष ईरमल यांनी जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सुविधा विशद केल्या आणि अवयव दानाचे महत्त्व उपस्थितांना सांगितले.
अहमदनगर येथील बाल हृदयरोग तज्ञ डॉ. रचना साबळे यांनी थॅलेसमिया रुग्णांमध्ये लोहाचे प्रमाण वाढल्यामुळे बालकांच्या हृदयाची काय आणि कशी काळजी घ्यायला पाहिजे हे सविस्तर पीपीटी प्रेझेंटेशनच्या द्वारे समजावून सांगितले. उपस्थित रुग्ण आणि पालकांना थॅलेसेमिया रुग्णांच्या सुकर आयुष्याचा मंत्र त्यांनी यावेळी दिला. डाॅ.हेमा सेलोत यांनी रूग्णांसाठी अन्न हेच औषध हे सांगितले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधीसेवा प्राधिकरण (अहमदनगर), जिल्हा रुग्णालय (अहमदनगर), एचएलए लॅब (अहमदनगर), जनकल्याण रक्तपेढी (अहमदनगर), शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन (अहमदनगर), एम. व्ही.आर फाउंडेशन (पुणे), कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल (मुंबई), डॉ. अनुराधा गोरे (अध्यक्षा, ऋतुजा फाउंडेशन),कमलेश चोथानी, महेश राहींज, महेश केवळ, स्वाती भांबुरकर, सौ.अमृता धारणगावकर, सौ.रेखा चुत्तर, डॉ. रूपाली महेशगौरी,डाॅ.गणेश मिसाळ, डॉ. कल्पना ठुबे, डॉ. गौरव सोनवणे, सूर्यकांत केवळ,सौ. शोभा अरोरा, बाळासाहेब साळुंके, चि.ऋषिकेश केवळ तसेच अहमदनगर होमिओपॅथिक कॉलेजचे सर्व डॉक्टर्स, विद्यार्थी ,कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
डाॅ.राजीव चिटगोपेकर,ॲड संजय पाटील, ॲड भूषण बराटे,ॲड अनिल सरोदे, अविनाश कराळे यावेळी उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ. ॲड. अंजली केवळ (संस्थापक सचिव, ऋतुजा फाऊंडेशन) सूत्रसंचालन सौ दिपाली उत्तर (सदस्या, ॠतुजा फाउंडेशन)आणि आभार कु. ऋतुजा केवळ (उपाध्यक्ष,ऋतुजा फाऊंडेशन) यांनी मानले.
إرسال تعليق