नाथसंप्रदायाने विशेष करून गोरक्षनाथांनी आज केल्या जाणा-या बहुतेक सर्व आसनांचा आविष्कार केला - टी. एन. परदेशी; गोरक्षनाथांच्या अक्षयजयंतीनिमित्त वाचा

 




◽ मख़दुम समाचार ◽
५.५.२०२३

     आज वैशाख पौर्णिमा गोरक्षनाथांचा प्रकटदिन; गोरक्षनाथांची अक्षयजयंती.
वैशाखी शिव पूर्णिमा तिथीषरेवारे शिवमंगले|
लोकानुग्रह विग्रह: शिवगुरूर्गोरक्षनाथोऽ भवत् ||
    मागच्या पीढीतील नेपाळ राजघराण्याचे राजगुरू व नाथसंप्रदायाचे एक गाढे संशोधक, अभ्यासक, नेपाळमधील काठमांडूच्या गोरक्षनाथ सिद्धांचल पीठाचे तत्कालीन महंत नाथसिद्ध योगी नरहरीनाथ यांनी एका प्राचीन ग्रंथातील हा श्लोक प्रकाशात आणला होता.
   मराठी परंपरेत गोरक्षनाथांचा प्रकटदिन कार्तिक महिन्याच्या शुक्लपक्षातील त्रयोदशीस साजरा केला जातो. आदिनाथ भैरव यांच्या नाथलिलामृत ग्रंथात त्यांनी एक श्लोक उद्धृत केला आहे - 
कार्तिक्यां शुक्लपक्षे च रेवत्यां च त्रयोदशी |
द्विपरार्धे दिवा विष्णोरंशो गोरक्षयोनिज:||
भस्मगोमय सम्भूतो गोरक्ष: स महामुनि:|
भूमिगर्भसंभूतो ध्यायेन्नाथं जगद्गुरूं ||
       महायोगी गोरक्षनाथांसारख्या अलौकिक सिद्धनाथांच्या प्रकटदिनाविषयी वेगवेगळ्या प्रदेशात अशा विविध मान्यता व धारणा असणे अगदी स्वाभाविक आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून सतराव्या अठराव्या शतकांपर्यंत ज्यांच्या दैहिक आस्तित्वाच्या खाणाखुणा मिळून येतात. त्यांच्या प्रकटदिनाविषयी अशा विविध धारणा समाजात असणे गैर नाही.
   सोबतच्या चित्रात गोरक्षनाथांचे युगप्रवर्तक व योगप्रवर्तक म्हणून दिसणारे स्वरूप दिसते. पातंजल योगात मोठेच परिवर्तन गोरक्षनाथांनी केले. पातंजल योगात आसने नाहीत. सुखासनात बसावे असे पातंजल योग सांगतो. नाथसंप्रदायाने विशेष करून गोरक्षनाथांनी आज केल्या जाणा-या बहुतेक सर्व आसनांचा आविष्कार केला. यात मत्स्येंद्रनाथ, जालंधरनाथ यांच्यासह अनेक नाथसिद्धांचे योगदान असले तरी सध्याच्या आसनांचे आविष्कारक हे गोरक्षनाथच आहेत.
मूलाधारबंध, जालंधरबंध व उड्डियानबंध या योगप्रक्रियेतील तीन महत्वपूर्ण बंधांची निर्मिती हे नाथसंप्रदायाचे फार मोठे योगदान आहे.
     पातंजल योगातील समाधी हे योगाचे अखेरचे अंग विकसित केले ते नाथसंप्रदायाने, यातही गोरक्षनाथांचे योगदान सर्वाधिक मोठे आहे. शून्य - महाशून्य समाधी विकसित केली ती गोरक्षनाथांनी. गोरक्षनाथांनी षडांग योग प्रस्थापित केला. यम व नियम ही पातंजल योगातील दोन प्राथमिक अंगे सुप्तावस्थेत नेली. यम व नियम ही अंगे गृहीतच आहेत, तो योगाचा अंगभूत भाग आहे. सद्वर्तन अंगी भिनल्याशिवाय योगाच्या प्रांगणात पहिले पाऊल टाकताच येत नाही, वैयक्तिक व सामाजिक मूल्यांचे अनुपालन करणे हा योग्याचा स्थायीभावच आहे. त्याचा बडेजाव कशापायी ? गोरक्षनाथांनी यम व नियम काढून टाकले नाहीत तर त्यांना योग्याने अंगी जिरवले पाहिजे, हे अधोरेखित केले आहे.
    लषड्कर्मांची तत्वेही गोरक्षनाथांनी प्रस्थापित करून योगाचे रूपांतर हठयोगात केले व सामान्य माणसासही समाधीचा मार्ग प्रशस्त करून दिला. ही गोरक्षप्रणित समाधी म्हणजे काय हे योगीराज ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात विषद केले आहे .
"...सारी संतपरंपरा गोरक्षनाथांची ऋणी आहे .आम्ही गोरक्षनाथांना विसरलो .." असे प्रतिपादन करणारे ओशो म्हणतात की "... कृष्ण, बुद्ध, पतंजली व गोरक्षनाथ हे भारतीय धर्माकाशातील सर्वाधिक महत्वाचे चार तारे आहेत."
- टी. एन. परदेशी. 
अहमदनगर (ह.मु.पुणे), महाराष्ट्र 





🤩 देशाची फेव्हरेट बाईक स्प्लेंडर आता इलेक्ट्रिक मध्ये; बघा, काय आहे किंमत आणि मायलेज


Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा