▫️मख़दुम समाचार▫️
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) १३.५.२०२३
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवारी दि. २० मे रोजी संध्याकाळी ५:३० वाजता 'दुर्गा भागवत - एक शोध' हे व्याख्यान आणि लघुपट असा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे.
कै. दुर्गाबाई भागवत यांचे वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारात मोठे योगदान आहे. अंजली किर्तने या दुर्गाबाईंवर माहिती देतील नंतर त्यांनी स्वतः तयार केलेला दुर्गाबाईंवरील लघुपट दाखवण्यात येईल. कार्यक्रमाला डॉ. सुधा जोशी यांनी आर्थिक सहाय्य केले असून केंद्रातर्फे रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
إرسال تعليق