अहमदनगर - छत्रपती संभाजी महाराज जयंती महाराष्ट्रात साजरी करण्यात आली. शेवगाव तालुक्यात पोलीस बंदोबस्तात मिरवणुक काढण्यात आली होती. परंतु सदर मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आली असता काही समाज कंटक जातीवादी आतंकी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शेवगाव मरकज मस्जीद समोर जातीवाचक घोषणाबाजी करून चीतावले व त्यानंतर मुस्लीम समाजाचे धार्मिक स्थळ मरकज मस्जीद वर हल्ला करून मास्जीद्चे नुकसान केले.
मिरवणुक पोलीस बंदोबस्त असतांना काही जातीवादी आतंकी संघटनेने मुस्लीम धार्मिक स्थळावर हल्ला कसा केला. त्यावेळेस पोलीस प्रशासनाची भूमिका काय होती?
मुस्लीम धार्मिक स्थळांवर काही जातीवादी आतंकी संघटनेचे लोक हल्ला करत होते आणी पोलीस प्रशासन त्यांचे सोबत दिसत आहे. हल्ले करणारे पोलिसांच्या स्वराक्षणात हल्ले करत होते का?
काही दिवसापूर्वी एका समाज कंटक ने मुस्लीम समाजाच्या इद च्या दिवशी याच शेवगाव मध्ये वक्तव्य केले होते की मुस्लीम समाजल बॉम्बने उडून दिले पाहिजे, त्या समाजकंटक च्या समर्थनात काही जातीवादी संघटन दिसले होते. प्रश्न असा की छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणूक आणि त्या समाज कंटक तसेच जातीवादी संघटन यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का?
काही दिवसापूर्वी आमदार नितेश राणे यांनी अहमदनगर दौऱा केला होता. त्यावेळेस त्यांनी आपल्या भाषणात असे सांगितले होते की मी इथे पूर्ण तयारीने आलो आहेत. त्यानंतर शेवगाव येथे एक व्यक्ती मुस्लीम समाजाला बॉम्बने उडून देण्याचे वक्तव्य करतो व नंतर छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणूकित काही समाज कंटक जातीवादी संघटन मुस्लीम धार्मिक स्थळावर हल्ला करून दंगल घडवतात या दंगलीचा व आमदार नितेश राणे यांचा कुठे न कुठे संबंथ असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पोलीस प्रशासन बेकायदेशीर मुस्लीम समाजाच्या घरी बेकायदेशीर घुसून घरातील महिलांना दमदाटी करत आहे, त्यांना धर्माच्या नावाने चुकीचा वक्तव्य केले, घरी पुरुष नसतांना मुस्लीम समाजाच्या घरी ज्या प्रकारे पोलीस घुसली. त्यावरून असे दिसते की पोलिसांनी मुस्लीम समाजात आपली दहेशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे मुस्लीम समाजावर अत्याचार झाले तरी त्यांनी त्याची तक्रार कोणाला करू नाही.
पोलीस प्रशासनाला आरोपी शोधण्याचे नावा खाली असे घरात घुसण्याची परवानगी कोणत्या वरिष्ठांनी दिली? पोलीस आपल्या वर्दीत का नव्हती? त्यांना नेमके काय करायचे होते? खरच पोलीस होते की जातीवादी आतंकी संघटनेचे लोकांनी मुस्लीम समाजात दहेशात निर्माण केली आहे?
पालकमंत्री हे शेवगाव येथे आले असता फक्त एकाच समाजाला भेटून त्यांची कैफीयत एकूण घेतली. परंतु मुस्लीम समाजाकडे पाहिले पण नाही. पालकमंत्री हे एकाच जाती धर्माचा नसून सर्वांचा असतो परंतु ज्या प्रकारे पालकमंत्री यांची भूमिका होती त्यावरून असे वाटते की पालकमंत्री यांना वरिष्ठांनी मुस्लीम समाजाकडे न जाण्याचे आदेश दिले असावे?
असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे तसेच शेवगाव पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न निर्माण झाले आहे. अहमदनगर मध्ये मागील काही महिन्यात धर्म सभेच्या नावावर मुस्लीम द्वेष पसरवण्याचे काही जातीवादी आतंकी संघटनेचा काम चालू आहे. यांचा एकच उद्देश म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात दंगल घडवणे. याची कल्पना पोलीस प्रशासनाला असून आम्ही त्यांना या सर्व घटनेची माहिती दिली आहे. परंतु प्रशासन कारवाई करण्यास का विलंब करत आहे याचा उत्तर सामान्य जनतेला मिळणे अपेक्षित आहे.
या सर्व घटनेची सी आय डी मार्फत चौकशी करावी आणि सामान्य जनतेला न्याय मिळून द्यावे.अशी मागणी एम आय एम चे जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी निवेदणाद्वारे मुख्यमंत्री, गृहमंत्री,अल्पसंख्याक आयोग, महाराष्ट्र पोलीस महासंचालक आदिं वरिष्ठांकडे निवेदणाद्वारे केली आहे.
إرسال تعليق