हुतात्मा स्मारकास अभिवादन करुन संविधान रक्षणाची शपथ घेत 'निर्भय बनो' जनचळवळीची सुरुवात !


▫️मख़दुम समाचार▫️ 
मुंबई (प्रतिनिधी) २.५.२०२३
    येथील हुतात्मा स्मारकास अभिवादन करुन संविधान रक्षणाची शपथ घेऊन 'निर्भय बनो' जनचळवळीची सुरुवात करण्यात आली. जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या या आंदोलनात छात्रभारती विद्यार्थी संघटना महाराष्ट्रभर ताकदीने सहभागी होईल असे मुंबई छात्रभारतीचे अध्यक्ष सचिन बनसोडे यांनी सांगितले.
  ते पुढे म्हणाले की, देशातील अघोषित हुकुमशाहीला संसदीय आयुधांचा वापर करुन आपल्याला रोखावे लागेल माझे छात्रभारतीच्या महाराष्ट्रातील सर्व आजी - माजी पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना व सर्वच विद्यार्थी मित्रांना आवाहन आहे आत्ता वेळ घरी बसण्याची नाही रस्त्यावर उतरुन लढण्याची आहे. आपल्याला शक्य त्या पध्दतीने आपण निर्भयपणे सत्तेला प्रश्न विचारूयात.
     या आंदोलनात राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य, आमदार कपिल पाटील, लोकशाहीर संभाजी भगत, सच्चीनांद शेट्टी, सुनील तांबे, संजय गोविंदवार, अजित वाघमारे, चंद्रकांत म्हात्रे, शिवाजी खैरमोडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. प्रकाश रेड्डी, उल्का महाजन, सुमेध जाधव, धनंजय शिंदे, सुधाकर कश्यप, फिरोज मिठीबोरवाला, सागर भालेराव, रोहित ढाले, साम्या कोरडे, स्मिता साळुंखे, अशोक कांबळे, दीपाली आंबरे, स्वाती त्रिभुवन, तुषार सूर्यवंशी, विकास मोरे आदी सहकारी उपस्थित होते.


Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा