◽ मख़दुम समाचार ◽
अहमदनगर (प्रतिनिधी) २०.६.२०२३
१७ महाराष्ट्र बटालियनला पद्मश्री डॉ.पोपट पवार यांनी भेट दिली. बटालियनचे कमांडिंग अधिकारी कर्नल चेतन गुरुबक्ष आणि प्रशासकीय अधिकारी ले. कर्नल रणदीप सिंग यांनी स्वागत केले. यावेळी पद्मश्री पवार म्हणाले की, एनसीसी आपल्याला शिस्तप्रिय, विवेकी, कर्तव्यदक्ष आणि देशाचे सच्चे नागरिक बनण्यास मदत करते. ते म्हणाले की, मी जिथे जिथे जातो तिथे तिथे एनसीसी कॅडेट्सना मी नक्कीच भेटतो. त्यांचे विचार आणि त्यांची क्षमता जाणून मला खूप अभिमान वाटतो. ते म्हणाले की, या ठिकाणी येण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे, येथे आल्यानंतर माझे मन प्रसन्न झाले.
कर्नल चेतन गुरुबक्ष म्हणाले की, आम्ही सर्व भाग्यवान आहोत की तुम्ही आमच्या बटालियनमध्ये आला आहात. तुमच्या आयुष्यातील संघर्ष आणि अनुभव सांगितले.
प्रशासकीय अधिकारी ले. कर्नल रणदीप सिंग यांनी पवार यांना जुलैमध्ये होणाऱ्या ए टी सी शिबिरात होण्याऱ्या व्याख्यानासाठी आमंत्रित केले, तुमचे विचार ऐकून आमचे कॅडेट्स तुमच्याकडून प्रेरणा घेऊन जीवनात पुढे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करतील.
यावेळी १७ महाराष्ट्र बटालियनचे सर्व कर्मचारी व पीआय कर्मचारी उपस्थित होते.
إرسال تعليق