माणसे जोडणारा अवलिया म्हणजे आर.सी.शाह - माजी अपर मुख्यसचिव एस.एस. संधू


मख़दूम समाचार 
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) २८.६.२०२३
    लेखापरीक्षण सहकारी संस्था मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक आर.सी.शाह हे नियत वयोमानानुसार दि. ३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्तीनिमित्त त्यांच्या मंगळवार दि. २७ जून रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या कार्यगौरव सोहळ्यात शासनाचे माजी अपर मुख्यसचिव एस.एस.संधू यांनी आर.सी.शाह हा माणसे जोडणारा अवलिया असल्याचे गौरवोद्गार काढले. या सोहळ्यास माजी सहकार आयुक्त सतीश सोनी, राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दि.कुलथे व अध्यक्ष विनोद देसाई, सहकार विभागातील वरिष्ठ अधिकारी तानाजी कवडे, राम शिर्के, आदी मान्यवर उपस्थित होते.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरचे सुपुत्र असलेले आर.सी.शाह यांनी खडतर परिस्थितीत नोकरी करुन उच्चशिक्षण घेतले. संगमनेर येथील अग्रगण्य अशा सर्वोदय नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये कारकून पदावर नोकरी करीत असतानाच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ पदावर शासनाच्या सहकार विभागात रुजू झाले आणि शासकीय सेवेतील विविध शिखरे पादांक्रात करीत आज विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षण) या वरिष्ठ पदावरुन सेवानिवृत्त होत आहेत. सहकार खात्याच्या लेखापरीक्षण या महत्वाच्या विभागात विविध पदांवर कर्तव्य बजावतानाच ते संघटनात्मक आणि क्रीडा क्षेत्रांतही कार्यरत आहेत.

आर. सी. शाह महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संघटन सचिव तर सहकार विभागातील राजपत्रित लेखापरीक्षण अधिकारी संघटनेचे संस्थापक महासचिव आहेत. शाह हे उत्कृष्ट टेबल टेनिस खेळाडू असून, त्यांनी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या ते महाराष्ट्र शासनाच्या टेबल टेनिस संघाचे व्यवस्थापक व प्रशिक्षक आहेत.

सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून ते सामाजिक कार्यातही सक्रीय असतात. आर. सी. शाह यांना त्यांच्या कार्याबद्दल, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा 'उत्कृष्ट कार्यकर्ता', मा. राज्यपाल, महाराष्ट्र यांचा 'कोरोना वॉरिअर २०२१'; राज्य शासनाचा 'कोरोना योद्धा'; गुजराथी समाजाचा राज्यस्तरीय ‘समाजरत्न' तसेच सर्वोदय पतसंस्था, संगमनेर यांचा 'स्व. नविनभाई शाह पुरस्कार' असे विविध पुरस्कार मिळाले आहेत. पतसंस्थांच्या व्यवस्थापनासंबंधी शाह यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे २५० ठिकाणी व्याख्याने दिली असून, 'पतसंस्थांच्या विश्वात' या पुस्तकाचे लेखनही केले आहे.

आर. सी. शाह हे संघटनांच्या दृष्टीने एक कार्यरत्न कार्यकर्ते असल्यामुळे त्यांना अधिकारी महासंघाच्या कार्यातून निवृत्ती देणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी या प्रसंगी स्पष्ट करुन त्यांच्या संघटन कौशल्याची प्रशंसा केली. या कार्यगौरव सोहळ्यास त्यांचे कुटुंबिय, तसेच मंत्रालयासह विविध शासकीय विभागांतील त्यांचा मित्रपरिवार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा