▫️मख़दुम समाचार▫️
अहमदनगर (प्रतिनिधी) १६.६.२०२३
महानगरपालिकेच्या केडगाव येथील प्रथम आय.एस.ओ. मानांकन प्राप्त ओंकारनगर प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक अमोल येवले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा कार्यकर्ते संग्राम कोतकर, दैनिक दिव्य मराठीचे वरिष्ठ उपसंपादक अनिल हिवाळे, पित्रोडा फर्निचरचे परेश पित्रोडा, केडगाव पोस्ट ऑफिसचे सबपोस्ट मास्तर संतोष यादव, सुवर्णराज ट्रेडर्सचे सुयश कटारिया यांची उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत शालेय परिसरातून प्रवेशफेरी काढली. पालक इम्रान मोमीन यांनी इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या रिक्षामधून सफर घडवून आणली. नवागतांचे गुलाबपुष्प व फुगे देऊन स्वागत करण्यात आले तसेच मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे व गणवेशांचे वाटप करण्यात आले.
केडगाव पोस्ट ऑफिसचे सब पोस्टमास्तर संतोष यादव व दैनिक दिव्य मराठीचे वरिष्ठ उपसंपादक अनिल हिवाळे यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. नगरसेवक अमोल येवले यांनी अध्यक्षीय मनोगतातून बोलताना ओंकारनगर शाळेत राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या उपक्रमांचे कौतुक केले. मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सहशिक्षिका वृषाली गावडे यांनी अध्यक्षीय सुचना केली. सहशिक्षक शिवराज वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहशिक्षिका वृषाली गावडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कवित वाघमारे, उपाध्यक्ष सविता लोखंडे, सदस्य ज्ञानेश्वर पाडळे, रेश्मा पानसरे, प्रियंका लोळगे, कविता वर्तले, दुर्गा घेवारे, पुनम बडे, रोहिणी काळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पालकांची उपस्थिती होती.
إرسال تعليق