रोटरी क्लबच्या रक्तदान शिबीरास प्रतिसाद

युवकांनी रक्तदान शिबीरात सहभागी झाले पाहिजे रो. माधवराव देशमुख

नगर - रक्त हे कोणत्याही फॅक्टरीत तयार होत नसल्याने गरजेवेळी रक्तदानाशिवाय पर्याय नसतो. आपल्या एका रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, यासाठी प्रत्येकाने रक्तदान करणे गरजेचे आहे. आज अपघात, विविध आजार, डायलेसिस यामुळे रक्ताची गरज मोठया प्रमाणात भासत आहे. त्याप्रमाणात रक्त उपलब्ध होत नाही. यासाठी युवकांना रक्तदान चळवळीत सहभागी होऊन रक्तदान केले पाहिजे.रोटरी क्लबच्या माध्यमातून यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे, विविध शिबीराच्या माध्यमातून रक्ताची गरज भागविण्याचे काम केले जात आहे. क्लबच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष माधवराव देशमुख यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ अहमदनगरच्यावतीने अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी क्लबचे अध्यक्ष माधवराव देशमुख, सचिव दिपक गुजराथी, राजेश उपाध्ये, प्रशांत बोगावत, जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. सोनवणे,डॉ.क्रांतीकला अनभुले, डॉ. सुनिल पवार, डॉ. डि.के.पवार आदि उपस्थित होते. 
याप्रसंगी सचिव दिपक गुजराथी म्हणाले, रोटरी क्लबने नेहमीच सामाजिक दायित्व जपले आहे, त्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांसाठी काम केले जात आहे. त्यातून त्यांची उन्नत्ती साधली जात आहे. होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या सहकार्याने असेच विविध उपक्रम राबविले जातील, असे सांगितले.
याप्रसंगी डॉ.क्रांतीकला अनभुले यांनी रक्तदानाचे महत्व सांगितले. या शिबीरात 21 जणांनी रक्तदान केले. रक्तसंकलनाचे कार्य जनकल्याण रक्तपेढीच्यावतीने करण्यात आले.  शेवटी राजेश उपाध्ये यांनी आभार मानले. 

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा