नगर - रोटरी क्लब अहमदनगर या अत्यंत नावाजलेल्या व 75 वर्ष वारसा असणाऱ्या क्लबच्या अध्यक्षपदी माधवराव देशमुख व सचिवपदी दीपक भाई गुजराती यांची बिनविरोध निवड झाली.तर डिस्ट्रिक्ट गवर्नर म्हणून स्वाती हरकल यांची निवड करण्यात आली.
माधव देशमुख हे सेवानिवृत्त कृषी अधिकारी असून ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी पदवीधर आहेत तसेच सेंद्रिय शेती व जिरायत शेती चे अभ्यासक आहेत.दिपक गुजराती हे नगर शहरांमध्ये नावाजलेले व तिसऱ्या पिढीचे फोटोग्राफर आहेत. सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य 40 वर्षापासून चालू आहे.
एक अनुभवी शेतीशास्त्रातील अभ्यासू ग्रामीण भागाची जाण असणारे नेतृत्व मिळाले आहे. त्याबद्दल समाजातील सर्व स्तरात त्यांचे अभिनंदन होत आहे. सदर क्लबचे मार्गदर्शक म्हणून डॉ रो प्रकाश कांकरिया, डॉ रो सुधा कांकरिया, रोटरीन सुरेश कांकरिया, रोटरीन निलेश वाईकर, रो प्रशांत बोगावत, हर्षवर्धन सोनवणे, कौशिक कोठारी, रो रवींद्र राऊत, रो महावीर मेहेर, रो गुप्ता, रो डॉ प्रो दादासाहेब करंजुले, रो बोरकर वकील, रो जवाहर मुथा, रो महेश गोपाल कृष्ण आदि आहेत.
إرسال تعليق