शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्याचा मुस्लिम मावळ्यांच्या वतीने निषेध.

अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या त्या युवकाचा मुस्लिम समाज व मुस्लिम मावळ्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निषेध नोंदविण्यात आला. तर सदर युवकावर कठोर कारवाई करण्याची व यामागील प्रमुख सूत्रधाराचा शोध घेण्याची मागणी  करण्यात आली.
शहरातील एका युवकाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक व आक्षेपार्ह संभाषण केल्याने सर्वच बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याप्रकरणी मुस्लिम समाज व मुस्लिम मावळ्याच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला यावेळी अजीम राजे, राजू जहागीरदार, दानिश शेख, शाहा फैसल सय्यद, अज्जू शेख, मोसीन शेख, राजू शेख, फिरोज शेख, अमीर खान,  मोहम्मद हुसेन शेख आदींसह समाजबांधव उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे असून, मुस्लिम समाजामध्ये त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. मात्र काही समाजविघातक प्रवृत्तींनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याने मुस्लिम समाजाच्या देखील भावना दुखावल्या गेल्या आहेत.या वक्तव्याचा मुस्लिम समाज जाहीर निषेध करत आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हे षडयंत्र रचण्यात आले आहे. मुस्लिम समाजाच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचे काही घटनाक्रम प्रामुख्याने समोर येत आहे. अशा प्रवृत्तींना ठेचून काढण्याची गरज असल्याचे सांगीतले. तर शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारकपणे करण्यात आलेल्या संभाषणाची सखोल चौकशी करून संभाषण करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी व या षडयंत्रमागील मुख्य सूत्रसंचाराचा शोध घेण्याची मागणी मुस्लिम समाजाने केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा