मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) १९.८.२०२३
येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले राजेश सरमाने यांना नुकतेच मानाच्या BEST PRODUCTIVITY IMPROVMENT या प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. ते इंडियन सिमलेस (किर्लोस्कर फेरस) येथे कार्यरत असून कंपनीच्या वतीने चांगली कामगिरी करणारास या पुरस्काराने गौरविण्यात येते.
यावेळी सत्कार करताना कार्यकारी अधिकारी निशीकांत एकतारे, अहमदनगरचे प्रमुख चैतन्य शिंदे, पुणे येथील मानव संसाधन प्रमुख जाकीर शेख, कामगार संघटनेचे राजेंद्र वाकळे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
राजेश सरमाने यांचे कामगार संघटना महासंघाने अभिनंदन केले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
إرسال تعليق