प्रबोधनकार सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांना यावर्षीचा एबीपी माझा'चा प्रतिष्ठित 'माझा सन्मान' पुरस्कार जाहीर


मख़दूम समाचार 
मुंबई (प्रतिनिधी) १४.८.२०२३
    जेष्ठ प्रबोधनकार सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांना यावर्षीचा एबीपी माझा न्यूज नेटवर्क तर्फे दिला जाणारा 'माझा सन्मान' पुरस्कार - २०२३ जाहीर झाला आहे.        
       ज्यांच्या विषयी प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये अभिमानाची भावना आहे अशा महाराष्ट्राच्या मानबिंदू ठरलेल्या व्यक्तींचा गौरवया निमित्ताने सदर पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे. ता. २१ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार सोहळा मुंबई येथे संपन्न होणार असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा मुंबई येथे हॉटेल आय टी सी ग्रँड सेंट्रल,परळ, मुंबई येथे सायंकाळी ठीक ०६:३० वाजता पार पडणार आहे.
     माझा सन्मान पुरस्काराचे यंदाचे हे पंधरावे वर्ष असून सत्यपाल महाराजांबरोबर यावर्षी ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर, अमेरिकेतील मिशिगन राज्याचे खासदार श्रीनिवास ठाणेदार, सिने-नाट्य दिग्दर्शक केदार शिंदे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, वारे गुरुजी, ज्येष्ठ संशोधक सुरेश वाघे यांना देखील पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.

सत्यपाल महाराज कार्यकर्तुत्व थोडक्यात...
     कर्मयोगी संत गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराज, संत तुकाराम, फुले, शाहू, आंबेडकर, संत कबीर हे सत्यपाल महाराजांचे आदर्श आहेत. सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज हे महाराष्ट्रातील ख्यातनाम समाजप्रबोधकार कीर्तनकार आहेत. आपल्या सप्तखंजिरीच्या माध्यमातून ग्राम स्वच्छता, अनिष्ट रुढी-परंपरा, जातीय दुर्भावना, हुंडा प्रथा, व्यसन मुक्ती, कुपोषण, शेतकरी आत्महत्या तसेच भारतीय संविधान जनजागृती आदी विषयांवर आपल्या कीर्तनातून प्रकाश टाकतात. इतकेच नव्हे तर ते त्यांच्या कीर्तनातून लोकांमध्ये रक्तदान, नेत्रदान, वृक्षारोपण, पाणी अडवा पाणी जिरवा, महिला सबळीकरण, साक्षरता मूल्यशिक्षण, स्वदेशीचा स्विकार, सामुदायिक विवाह अतिशय महत्वाचे विषयांवर देखील जनजागृती करतात.
     मनोरंजनाच्या अंगाने जाताना उपस्थितांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे सामर्थ्य त्यांच्या कीर्तनात, त्यांच्या भजनात आहे. समाजातील जातीवाद त्यांना मान्य नाही. जातीय वाद, विषमतेचा वाद कधीतरी संपायला हवा ही सत्यपाल महाराजांची तळमळ आहे. कारण जातीयवादाचे बरेच चटके सत्यपाल महाराजांनी जन्मापासूनच भोगलेले आहेत. आजही त्यांचा कार्यक्रम असला की हजारोंचा जनसागर उसळतो. गेली ५५ ते ५६ वर्षापासून प्रबोधनाच्या माध्यमातून सेवा देत असलेल्या सत्यपाल महाराजांचे जुन्या काळापासून ते आजतागायत महाराष्ट्रातील सर्व जिल्हातील आकाशवाणी केंद्र, दूरदर्शन केंद्र, आताचे विविध प्रसिद्ध असलेल्या मुख्य मराठी टी.व्ही. चॅनलसाठी महाराजांनी अनेक कार्यक्रमांचे सादरीकरण अनेक वेळा केलेले आहे.
   आतापर्यंत सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाच्या १२ भागात ऑडिओ कॅसेट, ०५ भागात व्हि.सी.डी.आणि डि.व्हि.डी., एम.पी.३ कंपन्यांनी प्रकाशित केलेल्या आहेत. इतक्या वर्षात महाराजांची लोकप्रियता कमी न होता ती वाढतच जात आहे त्यामुळे आजच्या आधुनिक युगात युट्युब, इंस्टाग्राम, फेसबुकच्या माध्यमातून सत्यपाल महाराजांचे जगभरात लाखो चाहते आहेत जे महाराजांना आजही फॉलो करतात.
      सत्यपाल महाराजांचे गेली ५७ वर्षात आतापर्यंत महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, गुजरात आदी राज्यात देखील जवळपास १६ हजारांपेक्षा जास्त प्रयोग यशस्वी झालेले आहेत. महाराष्ट्र व इतर राज्यात देखील सत्यपाल महाराज यांचा मोठा चाहता वर्ग वर्षानुवर्षापासून वाढतच आहे.
     सत्यपाल महाराजांच्या जीवनावर आतापर्यंत काही लेखकांनी प्रेरणादायी पुस्तके लिहलेली आहेत त्यामध्ये लेखकांनी सत्यपाल महाराज यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला आहे. यासह महाराजांनी देखील आतापर्यंत अनेक साहित्य लिहून ठेवले आहे. सत्यपाल महाराजांनी प्रबोधनाचा हा विचार अखंड अविरत तेवत राहावा यासाठी महाराष्ट्रात त्यांच्यासारखे सप्तखंजेरी वादक ५० प्रबोधनकार आज तयार केले आहेत. महाराजांना शासनाचे अति महत्त्वाचे ०४ पुरस्कार व इतर सामाजिक संघटकांतर्फे हजारो पुरस्कार मिळाले आहेत.
     सत्यपाल महाराज यांचा आप्त परीवार असून मुलगा धर्मपाल हा डॉक्टर आहे तर सात वर्षाची नातसुद्धा कीर्तन करते.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा