नगर - गेल्या काही महिन्यांपासून प्रभाग दोन मध्ये चारही नगरसेवकांच्या निधीतून तसेच राज्य शासनाच्या योजनांमधून आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नामुळे मोठा निधी मिळाला. त्या निधीतून ड्रेनेज, रस्ते कामांचा शुभारंभ होऊन ती कामे पुर्णत्वास येत आहे. आम्ही नगरसेवक परिसरातील प्रश्नांचा पाठपुरावा करीत असल्याने प्रभागात विकास कामांना गती मिळाली, असे प्रतिपादन माजी नगरसेवक बाळासाहेब पवार यांनी केले.
प्रभाग क्र.2 मधील निर्मलनगर रोडवरील अलंकापुरी सोसायटीत 300 एम.एम. बंद पाईप गटार कामाचा शुभारंभ बाळासाहेब पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. याप्रसंगी माजीनगरसेवक निखिल वारे, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, सुनिल शिरसाठ, प्रकाश सावंत, रवि गोसावी, प्रसाद साळी, सचिन लोटके आदि उपस्थित होते.
श्री.पवार पुढे म्हणाले, नगरसेविका संध्याताई पवार यांच्या प्रयत्नामुळे हे मोठे काम आता मार्गी लागले आहे. अनेक वर्षांपासून हा प्रश्न तांत्रिकदृष्ट्या प्रलंबित होता तो आता अडचण दूर झाल्याने सुटला आहे. नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधां पुरविण्यासाठी सर्व नगरसेवक कटीबद्ध आहोत, असे सांगितले.
निखिल वारे म्हणाले, प्रभाग मोठा असला तरी कामे मोठ्याप्रमाणावर सुरु आहेत. विकास कामांची ही प्रक्रिया निरंतर सुरु ठेवणार आहे. सुनिल त्र्यंबके यांनी सांगितले की, यापुढील काळातही जी कामे राहिली, त्या कामांना प्राधान्य देऊन ती पूर्ण केली जातील.
विनित पाउलबुधे यांनी यावेळी नागरिकांचे सहकार्य, आमच्या सर्वांच्या एक विचारांमुळे कामे करण्यास अडचणी येत नाही. विकासाचा समतोल साधून सर्व कॉलनी, वसाहती, परिसराचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न असतो.
अलंकापुरी सोसायटीमधील नागरिकांनी सर्व नगरसेवकांचे आभार मानले. यावेळी वालतुरे सर, कोरडे साहेब, बुधवंत साहेब, हिंगे साहेब, आदिंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते
إرسال تعليق