मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) ४.८.२०२३
येथील आम आदमी पार्टीच्या शहराध्यक्षपदी भरत श्रीराम खाकाळ यांची नियुक्ती करण्यात आली. आपचे महाराष्ट्र प्रदेश सहप्रभारी गोपाल इटालिया व राज्य संघटक सचिव अजित फाटके यांनी खाकाळ यांची नियुक्ती जाहीर केली.
आगामी लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका निवडणुकांच्या पाश्वभूमीवर आपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्राकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने राज्यभरातील संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करून नव्याने पक्ष बांधणीचे धाडसी पाऊल उचलण्यात आले आहे. बऱ्याच जुन्या चेहऱ्यांना बाजूला सारून नव्याने जबाबदारीची पदे देण्यास सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती प्रदेश सहप्रभारी गोपाल इटालिया यांनी दिली.
येत्या काळातील निवडणुका आम आदमी पार्टी संपूर्ण ताकतीने लढविणार असून, आपचे अस्तित्व सिध्द होणार आहे. दिल्लीच्या धर्तीवर शहरात आरोग्यासाठी प्रत्येक प्रभागात मोहल्ला क्लिनिक, उत्तम दर्जाची सरकारी शाळा, सर्वच क्षेत्रातील भ्रष्टाचार कमी करून नागरिकांना विना मोबदला वीज आणि पाणी उपलब्ध व शहरात कोणी युवक बेरोजगार राहणार नाही यासाठी एमआयडीसी/ आयटी पार्क उभारण्यासाठी आपच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याची भावना व्यक्त करुन या विकासात्मक चळवळीत आम आदमी पार्टीत सहभागी होण्याचे आवाहन भरत खाकाळ यांनी व्यक्त केली.
खाकाळ हे आपचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून, त्यांच्या नियुक्तीने आपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

إرسال تعليق