पुल खचून दुर्घटना झाल्यास प्रशासन प्रमुख आयुक्त व ठेकेदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा - ऋषिकेश आगरकर; काटवन खंडोबा रस्ता व पुलाचे काम तातडीने पुर्ण करावे म्हणून मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी


मख़दूम समाचार 
अहमदनगर (प्रतिनिधी) २३.८.२०२३
   शहरातील बहुचर्चित काटवन खंडोबा रस्त्याचे दुष्चक्र गेल्या ४ वर्षे झाले सुटण्याची चिन्ह दिसत नाहीत. स्टेशनरोड परिसर, आगरकरमळा, गायकेमळा व कल्याणरोड परिसरातील उपनगरे जोडणारा व वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा रस्ता आहे. जेणेकरून या भागातील लोकांचा वाहतुकीचा वेळ व खर्चामध्ये निम्म्याहून घट होऊ शकते. मध्यशहराला जोडणाऱ्या अनेक उपनगरांचा यामुळे सलग विकास होणार आहे परंतु या भागातील विद्यमान मनपा लोकप्रतिनिधींच्या हलगर्जीपणा व उदासीनता यामुळेच या रस्त्याचे शुक्लकाष्ट हटण्याचे चिन्ह दिसत नाही. या अत्यंत खराब रस्त्याच्या व पाडून ठेवलेल्या पुलाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अपघात झाल्यास पुल खचून दुर्घटना झाल्यास प्रशासन प्रमुख आयुक्त व ठेकेदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे ऋषिकेश आगरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य मुख्य सचिव, जिल्हाधिकारी सालीमठ यांच्याकडे केली आहे. काटवन खंडोबा रस्ता व पाडून ठेवलेल्या अपघातग्रस्त पुलाचे काम तातडीने मार्गी लावावे अशी त्यांची आग्रही मागणी आहे.
    ते पुढे म्हणाले की, आगरकर मळा भागातील वापरात व सुस्थितीत असलेला पूल गेल्या ४/५ महिन्यांपासून मनपा ठेकेदाराने पाडून ठेवला. अर्धवट पाडलेला पूल अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. या अर्धवट पाडलेल्या चिंचोळ्या पुलावरून महिला, शालेय विद्यार्थी, नोकरदार व या भागातील नागरिकांची जीव मुठीत धरून वाहतूक  सुरू आहे. शहरात जाण्यासाठी हा मार्ग जवळचा आहे. पूल खचून व इतर दुर्घटना घडून जिवीतहानी झाली तर यास संपूर्णपणे प्रशासन प्रमुख आयुक्त, ठेकेदार व मनपा लोकप्रतिनिधी असणार आहेत. या भागातील दळणवळण सुध्दा ठप्प होणार आहे तरी या विषयामध्ये महापालिका आयुक्त व प्रशासन कधी गंभीर होणार आहे ? असा संतप्त सवाल भारतीय जनता पार्टीचे ऋषिकेश आगरकर यांनी विचारला आहे.
    आयुर्वेद महाविद्यालय ते रेल्वे स्टेशन या रस्त्यासाठी आजवर अनेक आंदोलने महापालिकेत व रस्त्यावरसुद्धा झाली. सर्व आंदोलने येथील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने केली तरी त्यांना दरवेळी प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी वाटाण्याच्या अक्षताच हातात दिल्या. फक्त आश्वासनशिवाय काहीही पदरात पडले नाही. या रस्त्यासाठी ८ कोटींचा निधी राज्य सरकारने मंजूर करून ४ वर्ष झाली तरी महापालिका प्रशासनाकडून पुढील कार्यवाही करण्यात का विलंब होत ? याची चिंता सर्वसामान्य नागरिकांना तसेच येथील ज्येष्ठ नागरिक संघास पडली आहे . या भागातील लोकप्रतिनिधींकडून सुद्धा कोणत्याही प्रकारची अपेक्षा सर्व सामान्य नागरिकांनी करणे सोडून दिले आहे.
    तरी महापालिका आयुक्त व प्रशासनाने या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामासंदर्भात तातडीने लक्ष घालून पुढील कार्यवाहीचे आदेश देऊन काम पूर्ण करावे, अशी मागणी ऋषिकेश आगरकर यांनी केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा