अमर शहीद शिवराम राजगुरु जयंती दिनी कॉंग्रेस सेवा दल शताब्दी महोत्सव संपन्न

श्रीरामपूर प्रतिनिधी:
अखिल भारतीय कॉंग्रेस सेवा दलाची स्थापना होऊन शंभर वर्ष  पूर्ण झालेने अमर शहीद शिवराम राजगुरु यांच्या जयंतीचे औचित्य साधून थोर हुतात्मा राजगुरु यांचे जन्मगावी राजगुरुनगर ता, खेड, जि. पुणे (महाराष्ट्र) येथे नुकताच कॉंग्रेस सेवा दलाचा शताब्दी महोत्सव ध्वज वंदनाने सुरू करून कॉंग्रेस सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजीभाई देसाई यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष विलास औताडे यांचे पुढाकाराने शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीत प्रोत्साहन पर घोषणा देण्यात आल्या, या वेळी शहीद शिवराम राजगुरु यांचे स्मारक, डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली,
रॅलीचे पुढे रिध्दी सिध्दी मंगल कार्यालयात सभेचे रुपांतर झाले, यावेळी व्यासपिठावर कॉंग्रेस सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजीभाई देसाई, कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, प्रदेश अध्यक्ष विलास औताडे, पुणे जिल्हा कॉंग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष श्रीयुत भूजबळ, सहित शहीद शिवराम राजगुरु यांचे वंशज,म्हसकर आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कॉंग्रेस सेवादल कार्यकर्त्याना संबोधित करताना सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजीभाई देसाई यांनी सांगितले की,ज्या प्रमाणे स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारी शहिदांनी सन १९४२ साली महात्मा गांधी यांचे नेतृत्वाखाली  इंग्रजाविरुध्द 'करो, या मरो. चलेजाव चळवळीत हिरीरीने भाग  घेऊन इंग्रजांना सळो की पळो करून आपल्या प्राणाची आहुति दिली, त्याच प्रमाणे आज पुन्हा देश वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे, त्यासाठी सेवादल सैनिकांनी पदाची अपेक्षा न करता  दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी सज्ज राहण्याचे आव्हान केले,
या प्रसंगी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांचेही मार्गदर्शन लाभले, शहीद शिवराम राजगुरु यांचे वंशज तसेच स्वातंत्र्य सैनिकांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला, सदर कार्यक्रमासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच अहमदनगर जिल्हा कॉंग्रेस सेवादलाचे अध्यक्ष सुरेश झावरे, जिल्हा मुख्य समन्वयक मास्टर सरवरअली सय्यद, कॉंग्रेसचे प्रांतिक सदस्य कचरू पवार, पाथर्डी तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष नासीरभाई शेख, नजीरभाई शेख,  कैलास वाकचौरे, तात्या कुटे, रफिक शेख, जिवन पंचारिया, किशोर डांगे यांच्यासह अनेक सेवादलाचे सैनिक उपस्थित होते, प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्रीयुत भूजबळ यांनी मानले, राष्ट्गीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा