मख़दूम समाचार
१२.८.२०२३
स्वस्थ कोणास म्हणावे?
समदोष: समाग्नीश्च समधातु मलक्रिय: |
प्रसन्न आत्म इंद्रिय मन: स्वस्थ इति अभिधियते ||
शरीरातील वात-पित्त-कफ, अग्नि, मल, प्रसन्न आत्मा, इंद्रिय आणि मन सम स्थितीत असणे अशा अवस्थेला आयुर्वेद 'स्वस्थ' असे म्हणतो.
फक्त शरीर निरोगी असून उपयोग नाही, मन सुध्दा निरोगी हवे. ज्याप्रमाणे शारीरिक आजारांची लक्षणे जाणवली की आपण त्यावर उपचार घेतो, त्याचप्रमाणे स्वतःमध्ये अतिरिक्त मानसिक ताणतणाव किंवा नैराश्याची लक्षणे दिसू लागली की वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असते. विशेष करून १० वी व १२ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांमध्ये लक्ष ठेवून असे काही बदल जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करायला नको.
शारीरिक आरोग्यासाठी ज्याप्रमाणे पथ्यापथ्यचा विचार केला जातो. त्याचप्रमाणे मानसिक आरोग्यासाठीही तसा विचार होणे गरजेचे आहे. शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी नियमित व्यायाम, प्राणायाम सकस व पौष्टिक आहार घेणे गरजेचे असते.
- डॉ. प्रसाद ह. उबाळे पा.
आयुर्वेदाचार्य,
मनःस्वास्थ्य आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र,
शहर बँकेसमोर, भिडे चौक, सावेडी नाका,
अहमदनगर,
9822107037
आरोग्य आणि आयुर्वेद यांच्या माहितीसाठी 'मनःस्वास्थ्य आयुर्वेद' व्हॉटस्अप ग्रुप जॉइन करा. https://chat.whatsapp.com/De31CZITNPm84zX4tlF1es
إرسال تعليق