मीरा : भारतातील पहिली मीरा मिनीकार; एस.डी.कुलकर्णी यांच्या मीरा ऑटोमोबाईलचा पहिला प्रोटोटाइप

(Image - स्त्रोत bhp.com)

मख़दूम समाचार 
मुंबई (प्रतिनिधी)  १८.८.२०२३
    स्वतंत्र भारतातील पहिली मिनीकार कोणती असेल तर ती आहे कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील शंकरराव कुलकर्णी यांच्या मीरा ऑटोमोबाईल्स ॲण्ड इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज प्रा. ली. यांची मीरा मिनीकार. कोल्हापूर ही भारताबरोबरच जगाला दिशा देणारी कलानगरी आहे. तिथे अनेक कलाकारांना राजर्षी शाहूंनी राजाश्रय दिला तसेच कोल्हापूरसह देशाचा विकास व्हावा औद्योगिकता वाढावी म्हणून अनेक प्रयोग केले. आपल्या राज्यातील निकामी झालेल्या तोफा वितळवून अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना नांगर तयार करून दिले. आपल्या लोखंडांच्या खाणी कारखानदारांना सवलतीत दिल्या त्यामुळे तिथे उद्योजकता वाढली.
    स्वतंत्र भारतात १९४९ साली मीरा मिनीकार ही मीरा ऑटोमोबाईलचा पहिला प्रोटोटाइप ठरली. १९४९ मधे शंकरराव कुलकर्णी यांनी भारतीय जनतेसाठी एक कार तयार करण्याची योजना आखली ज्याची किंमत त्यावेळी १२ हजार रूपये  होती. कारचा पहिला नमुना १९४९ मध्ये आला होता, जी कार घेऊन शंकरराव कुलकर्णी मुंबईत फिरत असत. मिनी कार त्यावेळच्या सामान्य गाड्यांपेक्षा वेगळी असल्याने लगेचच लक्ष वेधून घेत होती. MHK 1906 या नोंदणी क्रमांकासह आरटीओमध्ये कारची नोंदणी करण्यात आली होती, अशी माहिती आनंद मेनन यांनी दिली आहे.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा