मख़दूम समाचार
पुणे (प्रतिनिधी) १८.८.२०२३
येथील रेंजहिल्स यूथ असोशिएशनच्या वतीने मराठी ख्रिस्त साहित्य परिषदेचे अध्यक्ष तथा २६ व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक पौलस वाघमारे यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. कार्यबाहुल्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्यावतीने आशिष आढाव यांनी पुरस्काराचा स्विकार केला. रेंजहिल्स यूथ असोशिएशनच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. यात ज्येष्ठ पत्रकार अशोक आंग्रे, नाट्य संस्कार संस्थेचे संचालक प्रकाश पारखी यांनाही जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
येथील वीरशैव भवन येथे नगरसेवक योगेश मुळीक व ज्येष्ठ समाजसेवक मारुतराव गलांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक संंदिप जर्हाड, अनिल नवले, नगरसेविक सुनिताताई गलांडे, नगरसेवक सचिन भगत व अशिष माने हे प्रामुख्याने उपस्थित होते. यानिमित्ताने १० वी व १२ वी परिक्षेत उज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात बहुसंख्य नागरिकांनी हजेरी लावली. सामाजिक, शैक्षणिक, नाट्य-कला व राजकीय क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहा सिंग यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर सुधीर हिवाळे यांनी आभार मानले.
إرسال تعليق