मख़दूम समाचार
पुणे (आबिदखान) ५.८.२०२३
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बीबीसी ॲण्ड सीए पदवी परीक्षेत अहमदनगरमधील इखलास अहमद वहिद अख्तर याने ९४ टक्के गुण प्राप्त करून मोठे यश संपादन केले आहे. पुणे येथील आजम कॅम्पसमध्ये आबेदा इनामदार कॉलेजचा हा विद्यार्थी आहे. यशाबद्दल इखलास अहमद याने सर्वश्रेष्ठ अल्लाहाचे आभार व्यक्त केले. यशामध्ये त्याचे शिक्षक, याचबरोबर त्याची आई शिक्षिका तस्किन वहिद अख्तर यांच्या अथक परिश्रम व सातत्याने केलेल्या प्रयत्नाचे हे यश आहे. त्याचे आजोबा ॲड. हनीफ बाबूजी यांचे मार्गदर्शन व प्रेरणेने आपण आज हे यश प्राप्त करू शकलो. अशी कृतज्ञता इखलास अहमद यांनी व्यक्त केली. त्याच्या यशाबद्दल समाजाच्या प्रत्येक स्तरातून त्याचे कौतुक होत आहेत.
إرسال تعليق