रफिक मेजर प्रनित राम रहीम प्रतिष्ठानच्या शिबीरात मोफत 500 रुग्णांची तपासणी 50 शस्त्रक्रिया 200 चष्मे वाटप

ग्रामीण भागात मोफत शिबीरे आयोजित होणे काळाची गरज
- काशिनाथ दाते
अहमदनगर - आज आरोग्य सेवा महाग होत असतांना सर्वसामान्यांना उपचार घेणे परवडत नाही. त्यामुळे अनेकजण आपल्या छोट- मोठ्या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु अशा मोफत शिबीर सर्वसामान्यांसाठी मोठा आधार ठरत आहेत. ग्रामिण भागात असे शिबीर मोठ्या प्रमाणात होणे आज काळाची गरज आहे. राम- रहिम प्रतिष्ठानाने सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवत आज मोफत शिबीराच्या माध्यमातून सामाजिक एकतेचा संदेश दिला आहे. रफिकभाई मेजर यांनी देशसेवा केली आता समाजसेवेतून आपले कार्य अधिक व्यापक करत आहे. सामाजिकतेचा कौटुंबाकडून त्यांना मिळालेला वारसा ते अशा सामाजिक उपक्रमातून पुढे सुरु ठेवत आहेत. धार्मिक कार्याला सामाजिक-एकतेची जोड देण्यार्‍या उपक्रमातून समाजोन्नत्तीचे काम होत आहे,व मंदिर मठात हा कार्यक्रम घेऊन  रफिक भाई यांनी प्रत्येक समाजापुढे एक फार मोठा आदर्श ठेवला आहे. हिंदू मुस्लिम साठी रफिक मेजर एक उत्तम उदाहरण व सच्चे सैनिक आहेत असे प्रतिपादन जि.प. बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी केले.
पारनेर तालुक्यातील रायतळे येथे सद्गुरु शांतानंद महाराज व सद्गुरु महादेव महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त   राम-रहिम सामाजिक प्रतिष्ठान व बुधराणी हॉस्पिटल पुणे   च्यावतीने मोफत मोतीबिंदू, नेत्रतपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जि.प.बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते, माजी आ.दादाभाऊ कळमकर, उद्योजक डोके, पं.स.सभापती अशोक दरेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रफिक शेख (मेजर), हभप साबळे महाराज, कॅप्टन नामदेव काळे, सुधीर काळे, सतीश काळे, इम्रान शेख,माया आल्हाट, दत्तात्रय रोकडे, रामदास गाढवे, विजय चितळकर, वंदना येणारे, लक्ष्मीबाई मांढरे, विष्णू चितळकर, श्रद्धा दरेकर, मंदा मेमाने,आशा मेमाने, अशोक झरेकर आदि उपस्थित होते.
रफिक मेजर म्हणाले, सामाजात एकता रहावी, समाजातील दु:ख नाहिसे व्हावे, यासाठी राम-रहिम प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. अशा उपक्रमातून समाजात एकता निर्माण होण्याबरोबरच गरजूंना आधार मिळत आहे. या कार्यात सर्वांचे मिळत असलेल्या सहकार्यामुळे हे कार्य अधिक व्यापक होत आहे. आज पुण्यतिथी सोहळ्याच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.
तीन दिवस सुरु असलेल्या या शिबीरात 500 जणांची नेत्र तपासणी व 50 जणांची मोतीबिंदू शास्त्रक्रिया बुधराणी हॉस्पिटल पुणे येथे करण्यात आली. दाते सरां तर्फे 200 जणांना मोफत चष्म्यांचे वाटप  करण्यात आले. पारनेर शहरात प्रत्येक महिन्याच्या 2 तारखेला मोतीबिंदू शिबीर मोफत आयोजित केले जाणार आहे. या उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे. 

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा