हिंदु मुस्लिम वादाचा जबाबदार मुसलमानच कसा ?

अहमदनगर - जिल्हाधिकरी
साहेबांनी जाहीरखुलासा करण्यात बाबत दि. ११ सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन. 
अहमदनगर शहर व जिल्हा हा मुस्लिम अत्याचारी जिल्हा घोषित करण्यात यावा.
पोलिस अधिकारी व कर्मचार्यां कडून मुस्लिमांवर एकतर्फी होणा-या कारवाई बाबत विचारणा केले असता सहज बोलतात, आम्हावर वरुन दबाब आहे. म्हणजे कोणाचा दबाब आहे. या बाबतचा खुलासा व्हावा.
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यात कुठेही तणाव निर्माण झाल्यास गैर मुस्लिमांना पालकमंत्र्या सोबतच्या बैठकीला बोलावले जाते आणि त्यांच्या बरोबर संवाद साधतात. मुस्लिम समाजाला का बोलवत नाही. मुसलमानांना बैठकीला न बोलविण्याबाबत कोणतं शासकीय ठराव व आदेश असल्याची त्या बाबतची माहिती
जिल्हाधिकारी साहेबांनी माध्यमातून जाहिर करावी.नसल्यास मुसलमानांना का बोलवले जात नाही याचा खुलासा ही करावा.
अहमदनगर शहर व जिल्ह्य़ात सकल हिंदु जनजागृती मोर्चाचे अनेंक मोर्चे आयोजीत करण्यात आले.या मोर्चात मुस्लिम समाजा विरोधात सतत हेटस्पीच करण्यात आले. तदनंतर सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाला डावलून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्या कारणाने धार्मिक स्थळांवर मुस्लिम व्यक्तींवर, घरावर, मोहल्यावर होणारे हल्ले यावर कोणतीही ठोस कारवाई होताना का दिसत नाही, परंतू मुस्लिम सामाजातील व्यक्तींवर खोटे आरोप असल्या नंतर ही सातत्याने होणारी एकतर्फी अटक व कारवाई करण्यात येते. या बाबत उदा. शेवगाव दंगलीत दोन मेलेल्या मुस्लिम व्यक्तींवर गुन्हयात नाव दाखल करण्यात आले होते.या बाबत खुलासा व्हावा.
मुस्लिम समाजाचा एक ना अनेक कारणाने मागिल काही महिण्यापासून मुसलमानांचा
छळ मांडला जात आहे. मुस्लिम धार्मिक स्थळ, दर्गा, धार्मिक ग्रंथ यावर होणारे सतत हल्ले कारणारे सापडतच नाही, आणि अन्याय होणा-या पिडीत मुसलमानाने फिर्याद प्रथम नोंदविल्या नंतर पोलिसांना सर्व सत्य माहिती असल्यानंतर ही अटक करण्यात
येवून जामिन मिळू दिला जात नाही. देशात न्याय मुस्लिमांसाठी वेगळा आणि गैर मुस्लिमांना वेगळा आहे का?
सविंधानात भारतीय मुसलमान दुय्यमदर्जाचा नागरिक आहे.असे कुठे आढळत होत असेल आपणाला ज्ञात असेल तर त्या बाबत लेखी अथवा तोंडी माहिती द्यावी. अहमदनगर शहर व जिल्हा मुस्लिम अल्पसंख्याक पीडित अत्याचारीत जिल्हा असल्याने दि ११ सप्टेंबर २०२२३ रोजी अहमदनगर जिल्हा मुस्लिम अत्याचार मुक्त जिल्हा करण्यासाठी मुस्लिम संरक्षण कायदा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे असे सय्यद अफजल अब्दुल कादर, ३३८/४ नशेमन कॉलनी, मुकुंदरगर
अहमदनगर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे कळविले आहे. 
मो.८८०४८१६९८४
महोदय,
वरील विषयानुसार दि. ११ सप्टेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर मी सय्यद अफजल अब्दुलकादर धरणे आंदोलनास बसणार असुन अहमदनगर जिल्हात मुस्लिमसमाज हा अत्याचारग्रस्त आहे. सतत राजकिय आणि समाजिक अत्याचाराने त्रस्त आहे. ज्यांच्या कडुन संरक्षणाची
अपेक्षा केली जाते तेच खात्यातील प्रमुख मुसलमानांना वरुन दबाव आहे असे बोलुन संरक्षण देणे टाळतात आणि राजकीय दबावाखाली मुसलमानांवर खोटे गुन्हे दाखल करतात. सवोच्च न्यायलयाच्या आदेशाची सतत
पायमल्ली होत आहे. मुस्लिमविरोधी वक्तव्य गैर मुस्लिम कार्यकर्ते करताहेत. राजकीय नेते मनाला वाटेल तीथे कोणत्याही वेळी करताहेत. सर्व होत असतांना प्रसाशन कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करत नाही. या साठी जिल्हाधिकारी साहेबांना विचारणा करण्यासाठी खरेच आम्ही या देशाचे दुय्यम नागरिक आहोत का ? याचा जबाब मागण्यासाठी ११ सप्टेबर रोजी घरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जो माझा संविधानिक अधिकार आहे. याबाबत ची सुचना देणे मी माझे कर्तव्य समजतो.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा