सयाजी शिंदे यांच्या 'आधारवड' चित्रपटाचा 'अल्ट्रा झकास' मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर


मख़दूम समाचार

मुंबई (रा.कों) २६.९.२०२३

    जीवनाला कलाटणी देणाऱ्या आधारवड’ चित्रपटाचा ता.२ ऑक्टोबर २०२३ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. सुरेश शंकर झाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून चित्रपटात सयाजी शिंदेशक्तीकपूरराखी सावंतरोहित हंचाटे आणि अतुल परचुरे हे नामवंत कलाकार दिसणार आहेत. 

    चित्रपटाची कथा श्रवण आणि त्याच्या प्रतिभावंत आयुष्याभोवती फिरते. श्रवणच्या आयुष्यात घडलेली एक भावनाविवश करणारी घटना त्याच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देऊन जाते. श्रवणचा जीवनप्रवास प्रत्येकासाठी एक प्रेरणा असून विचार करायला लावणारा आहे. 

आजच्या तरुणांना आपल्या पालकांचे महत्त्व सांगण्यासाठी आणि आपल्या पालकांप्रती आदर कमी होऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी आधारवड’ हा चित्रपट आजच्या तरुण वर्गाने आवर्जून पाहायला हवं.” असे अल्ट्रा मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.इ.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

अधिक माहितीसाठी  www.ultrajhakaas.com ला भेट द्या. जीवनाला कलाटणी देणाऱ्या वास्तवदर्शी भावनाविवश कथा सांगणाऱ्या आधारवड चित्रपटासोबतच झकास मनोरंजन, सदाबहार एकापेक्षा एक कौटुंबिक कथा, विनोदासह जबरदस्त ॲक्शन, थ्रिलर चित्रपटांतील ड्रामा अनुभवण्यासाठी लगेच डाउनलोड करा 'अल्ट्रा झकास ओटीटीॲप आणि तुमच्या कुटुंबासोबत अमर्याद आनंद घ्या अल्ट्रा झकासवरील एचडी कन्टेंटचा.

App link: https://ultrajhakaas.app.linkजीवनाला कलाटणी देणाऱ्या आधारवड’ चित्रपटाचे प्रोमो पाहण्यासाठी लिंक : https://www.facebook.com/UltraJhakaas

https://www.instagram.com/ultrajhakaas

https://www.youtube.com/@ultrajhakaas

https://twitter.com/ultrajhakaas

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा