रविवार 1 अक्टोबर चांद सुलताना हायस्कुल मध्ये शिक्षक, पालकांसाठी मोटीवेशनल कार्यशाळेचे आयोजन

मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) ३०.९.२०२३
     शैक्षणिक प्रगतीसाठी येथील चांदसुल्ताना हायस्कुल व्यवस्थापन/सतत प्रयत्नशील असते. प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मोटीवेशनल स्पीकर सईद अहमद यांची कार्यशाळा रविवारी ता. १ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहेत, अशी माहिती चेअरमन सय्यद अब्दुल मतीन दिली आहे.

रविवारी शाळेत होणाऱ्या पहिल्या सत्रात सकाळी १० ते ११:३० पर्यंत शिक्षकांसाठी वक्ते सईद अहमद मार्गदर्शन करणार आहेत. बदलत्या काळात, स्पर्धेच्या युगात शिक्षकांची महत्वपूर्ण भूमिका आणि जबाबदारी तसेच परिणामकारक ज्ञानदानाचे स्किल्स आणि टिप्स ते देणार आहेत.
     दुसरे सत्र हे पालकांसाठी असून दुपारी १२ ते १:३० पर्यंत पाल्यांच्या शिक्षणात पालकांची जबाबदारी, करियर निवडीत  शालेय शिक्षणापासून करायची तयारी आदी विषयांवर ते मार्गदर्शन करणार आहेत.
      नव्या व्यवस्थापनकडून प्रथमच या स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन होत असल्याने शहरातील सर्व अल्पसंख्यांक  संस्थेतील शिक्षकांनी व पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे चेअरमन सय्यद अब्दुल मतीन यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा