गरीब नवाज फाऊंडेशनच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात सर्व जाती- धर्मातील वधू - वरांनी सहभाग नोंदवावा - हाजी मुख्तारभाई शाह

मख़दूम समाचार 
श्रीरामपूर (प्रतिनिधी) १४.९.२०२३
येथील सर्व धर्मीय तथा सर्व जातीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी सुप्रसिद्ध असलेले गरीब नवाज फाऊंडेशन या संघटनेच्या माध्यमातून या वर्षी होणाऱ्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी संस्थापक अध्यक्ष,माजी नगरसेवक हाजी मुख्तारभाई शाह यांच्या वतीने सन २०२३ ची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून फाऊंडेशनच्या माध्यमातून ५ नोव्हेंबर २०२३ या रोजी होणाऱ्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासोबतच सन २०२३ या वर्षातील फाऊंडेशनच्या आयोजित वर्षभरातील विविध सामाजाभिमुख उपक्रमांच्या  अध्यक्षपदासाठी जाफर उर्फ नुरा शेख, उपाध्यक्षपदी जाफर हारुन शाह, सचिवपदी रज्जाक पठाण, आणी खजिनदार म्हणून अकबर पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
श्रीरामपूर येथील प्रियदर्शनी मंगल कार्यालय (ओपन थियटर) मध्ये संविधान बचाओ कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अहमदभाई जहागीरदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारणीच्या बैठकीमध्ये ही निवड करण्यात आली. याप्रसंगी  फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक हाजी मुक्तारभाई शाह यांनी ही निवड जाहीर केली.
दरवर्षी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे ही गत १४ वर्षापासून गरीब नवाज फाऊंडेशनची ख्याती आहे,या सामाजिक संघटनेमार्फत विविध जाती- धर्मातील वधू -वरांचे सामुदायिक विवाह सोहळ्यासोबतच प्रेषित हजरत मो.पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त शानदार कव्वालींचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत होता परंतु गेल्या वर्षभरापासून सदरील कव्वालीचा कार्यक्रम न करता समाजातील गरजू व गरीब बांधवांना मदत करण्याची भूमिका या संघटनेने घेतली आहे,
गरीब नवाज फाऊंडेशन नेहमीच सर्व जाती -धर्मातील उपेक्षित आणी दुर्लक्षीतांच्या ज्वलंत प्रश्नी त्यांना धीर व आधार देण्याचे निर्पेक्षतेसोबत खंबीरतेने भुमिका बजावत असल्याने प्रमुख पाहुणे असलेल्या मान्यवरांच्या मनोगतांद्वारे फाऊंडेशनच्या सर्व टिमचे कौतूक करत कार्यास शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविले जात असलेल्या विविध सामाजाभिमुख उपक्रमांसाठी अनमोल सहकार्य लाभलेल्या आणी लाभत असलेल्या तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे संस्थापक अध्यक्ष हाजी मुख्तारभाई शहा यांच्यावतीने आभार प्रकट करण्यात येवून येत्या ५ नोव्हेंबर २०२३ रोजी होणाऱ्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात जास्तीत जास्त सर्वधर्मिय वधू - वरांनी सहभाग नोंदवावा असे अवाहनही करण्यात आले.
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष हाजी मुजफ्फरभाई शेख,शहर काझी मौलाना अकबरअली सय्यद, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन तथा शिक्षक नेते सलीमखान पठाण,हाजी साजिदभाई मिर्झा,कुरेशी जमाअतचे अध्यक्ष महेबूबभाई कुरेशी, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, शिर्डी येथील सुप्रसिद्ध उद्योजक राजेंद्र पा.शेळके,समता फाऊंडेशनचे शौकतभाई शेख, ॲड.मोहसिन शौकत शेख,नदिम ताज,इब्राहिम मामु खाटीक, समाजवादीचे जोएफ जमादार,राष्ट्रवादीचे सोहेल बारूदवाला आदी मान्यवर उपस्थित होते.

*फाऊंडेशनची २०२३ कार्यकारणी पुढीलप्रमाणे*
अध्यक्षपदी - जाफर उर्फ नुरा शेख, उपाध्यक्षपदी- जाफर हारून शाह, महेश विलास इंगळे, नवाब शफी शेख. सहसचिवपदी - कासम गफ्फार शाह, रशीद खाजामिया कुरेशी.
कार्याध्यक्षपदी - रियाजखान हबीबखान पठाण, सहकार्याध्यक्षपदी- अध्यक्ष कैलास अशोक सासे,शकील सत्तार कुरेशी,शरीफ जिकर मेमन.खजिनदारपदी - अकबर नूरखान पठाण. सहखजिनदारपदी यासीन भाई सय्यद,अकरम मोहम्मद हुसेन कुरेशी, तोफिक शब्बीर शेख.
स्वागत अध्यक्षपदी- जाकीर हाजी उमरअली शाह. सहकार्याध्यक्षपदी  बिलाल ताहेर शहा, अजीज अब्दुल अत्तार. संघटकपदी नजीर गफूर शेख, नासिर मेहमूद सय्यद, संजू खंडू मोरे. इत्यादींची कार्यकारणीवर  निवड करण्यात आली असून निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.याप्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक हाजी मुख्तारभाई शाह यांनी सदरील सर्व पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहनही केले.
या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील समाजिक कार्यकर्त्यांसोबत अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास सासे,अनिल इंगळे,सलीम शाह, रहीम भाई शेख,आदींनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रज्जाकखान पठाण यांनी केले तर नुतन अध्यक्ष जाफर उर्फ नुराभाई यांनी आभार मानले.
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा