अहमदनगर : पटसंख्या अभावी
महापालिकेच्या शिक्षण मंडळाने
झेंडीगेट येथील उर्दू माध्यमाची शाळा
बंद केली असून तेथे कार्यरत असलेल्या दोन शिक्षिकांचे इतर शाळांमध्ये समायोजन केले जाणार असल्याचे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरात मनपाच्या एकूण १२ शाळा
आहेत. यातील दोन सेमी, दोन उर्दू तर आठ शाळा मराठी माध्यमांच्या आहेत.
उर्दू माध्यमाची शाळा सर्जेपुरा तर दुसरी झेंडीगेट येथे होती. झेंडीगेट येथील शाळेत पूर्णवेळ दोन शिक्षिका कार्यरत आहेत. शाळेत मात्र, गेल्या काही वर्षांपासून पुरेशी पटसंख्या नव्हती.
काही दिवसांपूर्वी मनपाचे अतिरिक्त
आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी या शाळेची तपासणी केली तेव्हा या
शाळेची पटसंख्या अवघी दोन
आढळून आली होती. याबाबत डॉ.
पठारे यांनी मनपाच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी यांना याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिक्षण विभागाने
शिक्षण उपसंचालकांना पटसंख्या बाबत अहवाल पाठवून शाळा बंद करणे बाबतची प्रक्रिया केली.
अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर
वास्तवता समोर
झेंडीगेट येथील शाळेत अनेक
वर्षापासून पुरेशी पटसंख्या नव्हती.
तरी ही शाळा चालविली जात होती.
अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे
यांनी या शाळेची तपासणी
केल्यानंतर पटसंख्या बाबतची
वास्तवता समोर आली. त्यानंतर
मनपाच्या शिक्षण विभागाने ही शाळा बंद करण्याची प्रक्रिया राबविली.
झेंडीगेट येथील मनपाच्या उर्दू
माध्यमाच्या शाळेत पुरेशी पटसंख्या नसल्याने ती शाळा बंद करण्यात आली आहे. येथे कार्यरत असलेल्या दोनपैकी एका शिक्षिकेचे तात्पुरत्या स्वरुपात रेल्वेस्टेशन येथील शाळेत समायोजन करण्यात आले आहे. दुसरी शिक्षिका झेंडीगेट येथील शाळेतच आहे. शासनाकडून या दोन्ही शिक्षिकेचे इतर ठिकाणच्या
उर्दू शाळांमध्ये समायोजन केले
जाणार आहे.
-जुबेर पठाण, प्रभारी प्रशासन
अधिकारी शिक्षण विभाग मनपा
إرسال تعليق