संघर्षांशिवाय कष्टकऱ्यांसमोर पर्याय शिल्लक नाही, जिथे कामगारांवर अन्याय होईल तिथे सिटू संघर्ष करायला कमी पडणार नाही - डॉ.डि.एल. कराड; श्रीक्षेत्र शनि देवस्थान येथे 'सीटु' कामगार संघटना मेळावा संपन्न !

(छायाचित्र - संदीप पवार)

मख़दूम समाचार 
नेवासा (प्रतिनिधी) २६.९.२०२३
    काल ता.२५ सप्टेंबर रोजी तालुक्यातील श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील कर्मचाऱ्यांना  कोविडकाळातील थकीत वेतन मिळणे, न्याय संगत वेतन संरचना करणे, हक्काची वेतनवाढ, बोनस, रजा आदी न्याय्य हक्कांसाठी व कामगार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी सिटु संलग्न श्री शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट कर्मचारी युनियनच्या वतीने सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ. डॉ. डी. एल. कराड व युनियनचे सचिव मेजर श्यामसुंदर शिंदे यांच्यासह शिष्टमंडळाने देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी दरंदले व उपकार्यकारी अधिकारी शेटे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.
    यावेळी ट्रस्टने १० तारखेपर्यंत वरील सर्व मागण्यांबाबत १० ऑक्टोबरपर्यंत संघटनेच्या कमिटीला विश्वासात घेऊन ठोस निर्णय घेऊ, असे कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.
     त्यानंतर संपन्न झालेल्या कामगारांच्या मेळाव्यास मार्गदर्शन करताना डॉ. कराड यांनी संघटना व संघर्षांशिवाय कष्टकऱ्यांसमोर आता कुठलाच पर्याय शिल्लक नाही त्यामुळे जिथे जिथे कामगारांवर अन्याय होईल तिथे सिटू संघर्ष करायला कमी पडणार नाही, असे प्रतिपादन केले.
    मेळाव्यास सिटुचे राज्यसचिव कॉ. देविदास आडोळे, कॉ. वसंत पवार, राज्य समिती सदस्य कॉ. तुकाराम सोनजे, कॉ. डॉ. ज्ञानेश्वर मोटे, सीटुचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष कॉ. महबूब सय्यद, सरचिटणीस कॉ. सदाशिव साबळे, कामगार नेते कॉ. भैरवनाथ वाकळे, कॉ. सिद्धेश्वर कांबळे, कॉ. दत्ता राक्षे, कॉ. महादेव पालवे, कॉ. राहुल गायकवाड, कॉ. लहूजी लोणकर, संदीप पवार यांनी मेळाव्यास संबोधित केले. याव्यतिरिक्त या मेळाव्यास स्थानिक कमिटीचे सदस्य व २५० पेक्षा अधिक कामगार उपस्थित होते.
     या मेळाव्यात १० ऑक्टोबरपर्यंत दिलेल्या मुदतीत कामगारांच्या मागण्यांवर व्यवस्थानाकडून सकारात्मक निर्णय नाही झाला तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय सर्व उपस्थित कामगारांनी एकमताने घेतला.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा