शरद्चंद्र पवार यांच्या उपस्थितीत भव्य वारकरी संमेलन; संत साहित्यावर परिसंवाद, मान्यवर कीर्तनकारांचा होणार सन्मान !


मख़दूम समाचार 
आळंदी देवाची (प्रतिनिधी) २३.९.२०२३
     संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पावनभूमीत पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत वारकरी संम्मेलन होत आहे. संमेलनात संत साहित्यावर परिसंवाद, चर्चा होणार असून मान्यवर कीर्तनकार यांचा सन्मान होणार आहे. वारकरी संतसाहित्य आजही ताजे टवटवीत असून समाजाला दिशा देणारे आहे. संतसाहित्यातील योग्य विचार समाजात रुजल्यास समता, स्वातंत्र्य, बंधुत्व वृधिंगत होऊन सामाजिक ऐक्य भक्कम होईल, हा आशावाद मनाशी दृढ  करून जे कीर्तनकार कार्य करीत आहेत त्यांचा सन्मान या संमेलनात होणार आहे.
    भागवत वारकरी महासंघाच्या वतीने आयोजिलेल्या या संमेलनात पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून दिनकरशास्त्री भूकेले सोहळ्याचे अध्यक्ष आहेत. विलास लांडे हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. विकास महाराज लवांडे करणार आहेत. या संमेलनात 'संत विचार आणि भारतीय संविधान' या विषयावर ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. तर ह.भ.प. दिनकर भुकेले शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या  संवादाचा विषय आहे 'मनुस्मृती आणि भागवत वारकरी संप्रदाय'. उद्धव महाराज शिंदे यांच्या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून ह.भ.प. दु:शासन महाराज क्षीरसागर हे पंचपदी करणार आहेत. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ह.भ.प. भारत महाराज जाधव हे करणार आहेत.
    कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भारत महाराज घोगरे गुरुजी, देवराम महाराज कोठारे, निरंजन महाराज सोखी, सुरेश महाराज भालेराव, सतीश काळे, राजू भुजबळ, समाधान महाराज देशमुख, तुकाराम महाराज घाडगे, शंकर बहिराट, मुबारकभाई शेख हे सर्वजण प्रयत्नशील आहेत.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा