नानव्हा ग्रामपंचायतीला 'राईट टू लव्ह'ची नोटीस; संविधानविरोधी ठराव रद्द करण्यास ७ दिवसांची दिली मुदत


मख़दूम समाचार 
पुणे (प्रतिनिधी) २२.९.२०२३
    गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील नानव्हा ग्रामपंचायतीने प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांना घरच्यांची परवानगी असेल तरच विवाह नोंदणी करणार असा ठराव केला. ही बातमी समाजमाध्यमातून पोहचल्यानंतर लगेच नानव्हा गावचे सरपंच सर्व पदाधिकारी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. हि नोटीस ग्रामपंचायतला काल मिळाली आहे, अशी माहिती राईट टू लव्हचे के.अभिजीत आणि कायदेशीर सल्लागार ॲड.वैभव चौधरी यांनी दिली.
   पुढे त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात प्रेमविवाहाला विरोध करण्यासारख्या घटना वाढत आहेत. आम्ही 'राईट टू लव्ह' या संघटनेच्या वतीने या घटनेचा कडाडून निषेध करत आहोत. नाशिक जिल्ह्यातील प्रकरण ताजे असतानाच, गोंदिया जिल्ह्यातील नानव्हा ग्रामपंचायतीनं देखील आईवडिलांची प्रेमविवाहाला संमती नसेल तर त्या प्रेमविवाहाची नोंद करण्यास नकार दिला आहे. असा बेकायदेशीर आणि असंविधानिक ठराव करण्याचा ग्रामपंचायतीला कोणताच अधिकार नाही. आपले संविधान जोडीदार निवडण्याचा अधिकार देते. मग तो जोडीदार कोणत्याही जाती धर्मातला असला तरी त्यात सरकारच्याही आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन म्हणून योजना असताना या बेकायदेशिर ठरवामुळे संविधानाने दिलेल्या अधिकारांचे उल्लंघन होत आहे. 
   पुढे त्यांनी सांगितले की, नानव्हा ग्रामपंचायतीने केलेला ठराव बेकायदेशीर असल्यामुळे आम्ही आमच्या राइट टू लव्ह या संघटनेमार्फत  नानव्हा ग्रामपंचायतीस कायदेशीर नोटिसी पाठवली असून हा ठराव नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आत रद्द करण्यास सांगितले आहे तसेच नोटीस नमूद कालावधीमध्ये ठराव रद्द न केल्यास ग्रामपंचायतीच्या सर्व सभासदांवर व अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाईची करणार असल्याचे सांगितले आहे. अधिक माहितीसाठी राईट टू लव्हचे के.अभिजीत +919766479547 आणि कायदेशीर सल्लागार ॲड. वैभव चौधरी +91 9970045847 यांना संपर्क साधावा.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा