पालकांनी आपल्या मुलांच्या सुप्त गुणांना वाव द्यावा - वीणाताई बोज्जा; किड्स सेकंड होम स्कुलमध्ये मोदक स्पर्धा संपन्न


मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) २५.९.२०२३
     प.पु. माताजी श्रीनिर्मलादेवी प्रणित विश्व निर्मल फौंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्री प्रायमरी स्कुलमध्ये विद्यार्थ्यांच्या महिला पालकांसाठी मोदक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजेत्यांना मा. नगरसेविका वीणाताई बोज्जा यांचे हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून गीता सातपुते, लीना सोन्नीस उपस्थित होत्या.
    सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रीगणेश स्थापनेनिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. मोदक स्पर्धेमध्ये ४० महिला पालकांनी सहभाग घेतला. प्रथम क्रमांक अश्विनी काळे, द्वितीय क्रमांक शितल वैराळ, तृतीय क्रमांक राजश्री टीपरे व उत्तेजनार्थ सुनीता सातपुते असे चार बक्षीसे तसेच सहभागी महिलांनाही स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
    यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पालकांना सहजयोग ध्यान साधनेबाबत माहिती देऊन कुंडलिनी शक्ती जागृतीचा कार्यक्रमही सहजयोग परिवाराच्या वतीने घेण्यात आला. अनेक महिलांना थंड चैतन्याची अनुभूती प्राप्त झाली.
     सुत्रसंचालन संगीता गांगर्डे यांनी केले, स्वागत दीपाली हजारे यांनी तर आभार आरती हिवारकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कोशाध्यक्ष संदीप गांगर्डे,  वैष्णवी नजन व नृत्य शिक्षका शुभम भालदंड यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा