मख़दूम समाचार
भिंगार (प्रतिनिधी) २२.९.२०२३
नागरदेवळे येथील महात्मा फुले तरुण मंडळाच्या गणेशोत्सवात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायकराव देशमुख यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. यावेळी मंडळाच्या वतीने देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुकुलशेठ देशमुख, स्वप्नील वारुळे, मंडळाचे पदाधिकारी सागर ताठे, ॲड.बाळासाहेब पुंड, बाळासाहेब शिंदे, नानासाहेब दळवी, अशोक ताठे, दीपक चव्हाण, संतोष गोंधळे, गणेश क्षीरसागर, सचिन गोंधळे, निलेश पुंड, राकेश ताठे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना देशमुख यांनी मंडळाने ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी डी.जे.न लावण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. मंडळाने आरोग्य विषयक, मुले व महिलांसाठी उपयुक्त विविध स्पर्धांचे आयोजन करावे. यासाठी पुर्ण सहकार्य राहील. गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजात परस्पर सद्भाव व स्नेह वाढावा. डी.जे.मुक्त गणेशोत्सवासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा विनायकराव देशमुख यांनी व्यक्त केली.
إرسال تعليق