हॉस्पिटलमध्ये राडा डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण तोफखान्यात गुन्हा दाखल

अहमदनगर (दि.६ सप्टेंबर):-सावेडी उपनगरातील हार्टबीट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी आज दि.६ सप्टेंबर रोजी पहाटे हॉस्पिटलमध्ये धिंगाणा करत वस्तूंची तोडफोड केली.
या प्रकरणी डॉ.चंद्रकांत कदम यांनी आज दुपारी आप्पासाहेब बबन वाकचौरे, काकासाहेब बबन वाकचौरे व इतर तिघे (रा.रांजणगाव,ता. नेवासा) यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या नुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 1342/2023,भादविक323,504,427,143,147,148,149 महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था(हिंसक कृत्य आणि किंवा नुकसान प्रतिबंध) कलम 4,6 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे आहे.
बबन वाकचौरे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.त्याचा राग मनात धरून आप्पासाहेब व काकासाहेब वाकचौरे यांनी हॉस्पिटलमधील डॉ.कदम, डॉ.अनिकेत गुणे व कर्मचारी विशाल काळे यांना मारहाण केली. तसेच हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागातील मॉनिटर,व्हेंटीलेटर, खुर्ची,बेड रोलिंग यांची मोडतोड केली. या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे व गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास पोना/चांगदेव आंधळे हे करत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा