मख़दूम समाचार
अहमदनगर (विजय मते) २६.९.२०२३
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला, या उत्सवात आधात्मिक, पौराणिक, धार्मिक देखावे मंडळे सादर करत आपली संस्कृती जोपासत आहेत. १० दिवस उत्साहाने तरुण या उत्सवात रमून जातात. श्रीगणेश ही बुद्धीची देवता आहे. श्री ला नमन करुन आपण शुभ कार्याचा श्रीगणेशा करतो. जैन धर्माच्या तत्वानुसार चातुर्मासानिमित्त उपवास करुन धर्मतत्वांचे पालन केले आहे. त्यांचा सत्कार करुन मंडळाने धर्मकार्यास प्रोत्साहन दिले आहे, असे प्रतिपादन अहमदनगर मर्चंट बँकेचे संचालक संजय चोपडा यांनी केले.
कापड बाजार येथील आदर्श व्यापारी मित्र मंडळाने तपस्वींचा सत्कार केला. याप्रसंगी संजय चोपडा, मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र ताथेड, उपाध्यक्ष किरण पोखरणा, डॉ.सचिन बोरा, खजिनदार अमित पितळे, राजेंद्र गांधी, मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी चोपडा म्हणाले, भगवान महावीर चषक परिवारातर्फे सवंत्सरी काळात अनेक सदस्यांनी उपवास करुन आपली तपस्या पुर्ण केली; या सर्वांचा आज आदर्श व्यापारी मित्र मंडळाने कर्तव्य म्हणून तपस्या सदस्यांचा सत्कार केला, यामधून इतरांना प्रेरणा मिळेल, असे ते म्हणाले.
या तपस्या सदस्यांमध्ये प्रितम गुंदेचा, प्रितम पोखरणा, नम्रता ताथेड, प्रफुल्ल मुथा, निखिल गुगळे, जितू पोखरणा, रुपेश कटारिया, विकास सुराणा, अतुल शेटीया, स्विटी शेटीया आदींनी ३,१५,८ असे उपवास केले. मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र ताथेड यांनी सर्वांचा सत्कार करुन आभार मानले.
إرسال تعليق