शब्दगंध साहित्यिक परिषदेचे सात व आठ ऑक्टोबर ला नगर मध्ये राज्यस्तरीय साहित्य संमेलन


मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) १०.९.२०२३
  शब्दगंध साहित्यिक परिषदेचे पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन शनिवार दिनांक सात व रविवार दि.आठ ऑक्टोबर रोजी अहमदनगर येथील गुणे शास्त्री आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित  करण्याचे निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष आमदार संग्रामभैया जगताप यांनी दिली.
        शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली कोहिनूर मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे,संस्थापक सुनील गोसावी, वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड.भूषण ब-हाटे, नवजीवन प्रतिष्ठान चे राजेंद्र पवार, सुनीलकुमार धस, कार्यवाह सुभाष सोनवणे, शर्मिला गोसावी, बबनराव गिरी, सरोज आल्हाट, खजिंनदर भगवान राऊत, ॲड सुभाष भोर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र चोभे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संमेलनातील साहित्य लोकजागर यात्रा, ग्रंथ प्रदर्शन, शाहिरी जलसा, उद्घाटन,परिसंवाद विषय, चर्चासत्र, कथाकथन,कवी संमेलन, प्रगट मुलाखत, सांस्कृतिक कार्यक्रम  व समारोप समारंभ याबाबत चर्चा झाली.
पुढील आठवड्यात १९ सप्टेंबर रोजी दु ११वा.शब्दगंध ची वार्षिक सर्व साधारण सभा आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनात मान्यवर साहित्यिकांसह  नवोदितांना मोठ्या संख्येने सामावून घेण्यात येणार असून नवोदितांनी संमेलनासाठी नाव नोंदणी 
( ९९२१००९७५० ) करावी असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे यांनी केले आहे. संमेलनात दोन काव्य संमेलने, दोन परिसंवाद होणार असून संमेलनाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे. सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील दोन प्रज्ञावंतांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार असून सामाजिक, साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रज्ञावंतांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. सन 2021 व 2022 च्या राज्यस्तरीय वाड:मय पुरस्काराचे वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
बैठकीचे प्रास्ताविक संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केले सूत्रसंचालन सुनील धस यांनी केले तर शेवटी भगवान राऊत यांनी आभार मानले.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा