गुटखा खाणाऱ्यांनो काय तुम्हाला माहित आहे का तुम्ही खरेदी करत असलेल्या एक गुटखा पाऊच मधून तुम्हाला मरायचं औषध दिलं जातंय!
गुटखा उत्पादन प्रक्रियेत फक्त
सुपारी, कथआ, चुना, पराफीन वॅक्स , सुगंधी एसेन्स व्यतिरिक्त अन्य पाच घातक केमिकल्स ही वापरले जातात. यांची नावे आणि वापर वाचाल तर थक्क व्हाल! हेच केमिकल्स तुम्हाला स्लो पॉइजन रुपात हायपर टेन्शन, नपुंसकता, हृदयरोग, व कॅन्सर सारखे रोग अगदी मोफत देतात. म्हणजेच गुटख्याची एक पाऊच म्हणजे मरायचं औषध!
*Phenanthrene*- याचा वापर मुख्यत्वे रंग निर्मिती, प्लास्टिक निर्मिती, पेस्टसाईड्स निर्मिती व नशा करणारे ड्रग्ज निर्मितीत केला जातो.
*Anthracene* - याचा वापर अन्न प्रक्रिया उद्योगात परिसर्वेटिव्हज बनविण्यात केला जातो.तसेच कीटकनाशके निर्मितीत, औद्योगिक क्षेत्रात कोटिंग मटेरियल मध्ये हे वापरले जाते.
*fluranthene*- हे केमिकल लाकडी वस्तुंसाठी जी पॉलिश तयार केली जाते त्यात हे असते, तसेच औषध निर्मिती क्षेत्र व केबल इन्सुलेशन मध्ये सुद्धा हे केमिकल वापरले जाते.
*Pyrene*- हे केमिकल प्लास्टिक निर्मिती, कीटकनाशके निर्मिती क्षेत्रात वापरले जाते. हेच केमिकल ओरल कॅन्सर साठी मुख्यत्वे कारणीभूत असल्याचा अहवाल तज्ज्ञांनी दिला आहे.
(वरील दिलेली सर्व माहिती नेट वर उपलब्ध आहे)
तर पाहिलं ना मित्रांनो *क्षणिक किक* साठी आम्ही काय खातोय? किंबहुना दररोज गुटख्याच्या पाऊच मधून आम्ही *मरायचं औषध* विकत घेतोय.
إرسال تعليق