मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) ८.९.२०२३
मराठा समाजाला आरक्षण द्यावे व भारतामध्ये लोकसंख्या नियंत्रण कायदा लवकरात लवकर करण्याच्या मागणीसाठी मार्केटयार्ड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार संग्राम जगताप समवेत विलास कराळे पाटील, गणेश आटोळे, प्रकाश घोलप, मनोज कर्डिले, जुनेद बागवान, कुदुस शेख, लक्ष्मण ढगे, भैय्या पठाण, केशव बरकते, बाली बांगरे, बंटी भिंगारदिवे, तवसिफ शेख, दत्ताभाऊ वामन, संकेत वारे, अभिजीत कराळे, अक्षय पटेकर, भाऊ वारे, रावसाहेब काळे, समद सय्यद, मजर खान, शहादाब पठाण, वाहिद सय्यद, मनोज कर्डिले, लक्ष्मण ढगे, सचिन कोतकर, संदीप पखाले, अफसर शेख, विनोद सौदागर आदी उपस्थित होते.
मराठा समाज हा ३५ वर्षांपासून उन्नतीसाठी आरक्षण मागत असून त्यासाठी समाजाने हजारो आंदोलने केलेली आहे. कित्येक तरुणांनी हुतात्मा पत्कारले असून माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घेऊन आत्महत्या केली होती तसेच कित्येक तरुणांनी आत्महत्या केलेले आहे. कित्येक मुलांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांचे करिअर उध्वस्त झाले आहे. कित्येक तरुणांनी जेल भोगलेले आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये वीस लाख व तीस लाख लोकांचे मोर्चे काढून समाजासाठी आरक्षण मिळावे या मागणीसाठी केलेले आहे. जगामध्ये कुठेही भविष्यात कधीही न निघणाऱ्या मोर्चे काढले आहे. समाजातील सर्व घटकातील तरुण मुले, मुली, वृद्ध, महिला, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. हे मोर्चे शांततेमध्ये झालेले आहे. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार कमी पडलेले असून महाराष्ट्रातील सर्व खासदार आमदार यांचे कर्तव्य होते की आरक्षण मिळूपर्यंत पाठपुरावा करायचा व मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे पण समाजाचे जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहे. त्यांनी मतदारांची समाजाची दिशाभूल केलेली असून आज सर्व लोकप्रतिनिधींनी मराठा समाजाला आंदोलने करण्याची वेळ येऊ न देता सरकारने
मराठा समाजाला आरक्षण दिलेले नाही याच्या निषेधार्थ मराठा समाजातील सर्व आमदार खासदार यांनी आपल्या आमदारकीचे खासदारकीचे राजीनामे सामूहिकरित्या नैतिक जबाबदारी म्हणून द्यावे तसेच ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या बद्दल अपशब्द बोलणाऱ्याचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनाला मुस्लिम समाजाचा देखील पाठिंबा देण्यात आला होता. देशांमध्ये १४० कोटी लोकसंख्या झालेली असुन जगातील कोणत्याही महासत्ता प्रगत देशांमध्ये लोकसंख्या एवढी नसून याचा विचार सरकारने करून देशातील काही धनवान लोक वेळ आल्यास देश सोडून प्रगत देशात स्थायिक होतील यातून देशातील मध्यमवर्ग गरीब वर्गाला दुष्परिणाम भोगावे लागतील. अन्नधान्याची कमतरता होऊ शकते अराजकता माजू शकते. यासाठी याचा विचार करून देशांमध्ये लोकसंख्या नियंत्रण कायदा करावा व त्याची अंमलबजावणी करण्यात यावी.
मराठा समाजाला आरक्षण दिले गेले नाही याच्या निषेधार्थ अहमदनगर शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध व्यक्त करत धरणे आंदोलन करण्यात आले.
إرسال تعليق